esakal | IND vs ENG मालिकेमध्ये भारताने काय कमावलं? जाडेजा म्हणतो...
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India-Day-1

IND vs ENG मालिकेमध्ये भारताने काय कमावलं? जाडेजा म्हणतो...

sakal_logo
By
विराज भागवत

चार कसोटी सामन्यात भारताने घेतली २-१ची आघाडी

Ind vs Eng 5th Test Cancelled: भारत-इंग्लंड पाचवी कसोटी कोरोनाच्या संसर्गामुळे अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय झाला. त्यानंतर हा सामना पुनर्नियोजित करावा आणि दोन्ही संघाच्या सोयीनुसार खेळवावा, अशी ऑफर BCCI ने दिली आहे. परंतु आता भारतीय खेळाडूंना IPL चे वेध लागले असताना या मालिकेतून काय कमावलं? याबद्दल माजी फलंदाज अजय जाडेजाने मत व्यक्त केले.

हेही वाचा: IND vs ENG: पाचवा कसोटी सामना रद्द! BCCI- ECB चर्चेनंतर निर्णय

"कसोटी मालिकेत भारताच्या दृष्टीने अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मालिकेतून भारताला एक प्रतिभावान सलामी जोडी मिळाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी दमदार सलामी देत संघाला उत्तम सुरूवात करून दिली. रोहित शर्माने एका वेगळ्या पद्धतीचा खेळ खेळला आणि धावा केल्या. त्याची कसोटी सलामीवीर म्हणून भूमिका वेगळी होती आणि त्याचा त्याला नक्कीच फायदा झाला. जर शुबमन गिल दुखापतग्रस्त झाला नसता तर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला आली नसती. शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल दोघेही दुखापतग्रस्त झाल्याने राहुलला संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं", अशा शब्दात अजय जाडेजाने आपलं मत मांडलं.

KL-Rahul-Rohit-Sharma

KL-Rahul-Rohit-Sharma

हेही वाचा: IND vs ENG : शास्त्री-कोहली यांच्यासाठी कोरोनाची वेगळी नियमावली?

BCCI ची ECB ला नवी ऑफर

भारतीय चमूतील काहींना कोरोनाची बाधा झाल्याने पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. पण हा कसोटी सामना दोन्ही संघातील खेळाडूंच्या सोयीनुसार पुनर्नियोजित करावा अशी विनंती आम्ही ECB ला केली आहे. BCCI आणि ECB यांच्यातील व्यावहारिक संबंध सलोख्याचे आहेत. त्यामुळे ही विनंती करण्यात आली आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खेळण्याचा योग्य कालावधी कोणता असावा, याबद्दल दोन्ही क्रिकेट बोर्डांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि सुरक्षितता याला BCCI ने कायमच प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे सामन्याबाबत निर्णय घेण्यात आला, असे BCCIच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

loading image
go to top