WI Vs IND : रोहित शर्मा 26 वर्षाच्या अष्टपैलूसाठी श्रेयस अय्यरला देणार का डच्चू?

Rohit Sharma May Include Deepak Hooda In Place Of Shreyas Iyer in West Indies Vs India 2nd T20I Match
Rohit Sharma May Include Deepak Hooda In Place Of Shreyas Iyer in West Indies Vs India 2nd T20I Match esakal

West Indies Vs India 2nd T20I : भारताने वनडे मालिकेतील 3 - 0 असा विजय मिळवत वेस्ट इंडीजला व्हाईट वॉश दिला. आता पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत देखील भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघात रोहित शर्मा (Rohit Sharma), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिक यासारख्या अनुभवी खेळाडूंची वापसी झाली आहे. त्यामुळे टी 20 संघ अजूनच तगडा झाला आहे. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात 44 चेंडूत 64 धावांची आक्रमक खेळी केली. तर दिनेश कार्तिकने स्लॉग ओव्हरमध्ये 19 चेंडूत 41 धावा करत भारताला 190 चा टप्पा गाठून दिला.

Rohit Sharma May Include Deepak Hooda In Place Of Shreyas Iyer in West Indies Vs India 2nd T20I Match
WI vs IND : भारताला विंडीजला मात देत पाकिस्तानशी बरोबरी करण्याची संधी

रोहित शर्माने पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवला सलामीला पाठवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता दुसऱ्या सामन्यात देखील रोहित शर्मा एका अष्टपैलू खेळाडूला (All Rounder) संघात स्थान देण्याची शक्यता आहे. रोहित दीपक हुड्डाला (Deepak Hooda) संघात स्थान देण्याची शक्यता आहे. जर दीपक हुड्डाला संघात सामावून घ्यायचे असेल तर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संघातून बाहेरचा रस्ता दाखवावा लागले. श्रेयस अय्यरचे टी 20 संघातील स्थान सध्या तीर डळमळीत दिस आहे. दीपक हुड्डाने यापूर्वी टी 20 मध्ये काही आकर्षक खेळी केल्या आहेत. तसेच त्याची ऑफ स्पिन देखील भारताच्या कामी येऊ शकते. यामुळे भारतीय संघाला एक चांगली स्थिरता मिळेल. दुसरा सामना होत असलेले सेंट किटचे ग्राऊंड हे लो स्कोरिंगसाठी ओळखले जाते. अशा परिस्थितीत संघात अजून एक अतिरिक्त स्पिनर असणे गैर नाही.

Rohit Sharma May Include Deepak Hooda In Place Of Shreyas Iyer in West Indies Vs India 2nd T20I Match
IND vs WI: रोहित शर्मा अँड टीमला मिळत नाहीय अमेरिकेचा व्हिसा

पहिल्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडीजच्या फायर पॉवरला रोखून धरण्यात फिरकीपटूंनी चांगली भुमिका बजावली होती. अश्विने निकोलस पूरन आणि शेमरॉन हेटमायरची विकेट घेत विंडीजची फायर पॉवर निष्प्रभ केली. तर जडेजाने जेसन होल्डरची शिकार करत त्याला शुन्यावर माघारी धाडले. दुसऱ्या बाजूला युवा रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी 2 विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली. विंडीजच्या फलंदाजांना चांगली सुरूवात करून देखील मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे भारताने विंडीजला 8 बाद 112 धावातच रोखले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com