WI vs IND : भारताला विंडीजला मात देत पाकिस्तानशी बरोबरी करण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

West Indies Vs India 2nd T20I Team India Have A chance To Broke Pakistan World Record

WI vs IND : भारताला विंडीजला मात देत पाकिस्तानशी बरोबरी करण्याची संधी

West Indies Vs India 2nd T20I : भारत आणि वेस्ट इंडीज (West Indies Vs India) यांच्यातील पाच टी 20 सामन्यातील दुसरा सामना आज सेंट किट्समध्ये खेळला जाणार आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना जिंकत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात भारत विजय मिळवत मालिकेतील आपली आघाडी वाढवून मालिका विजयाच्या जवळ पोहचण्याचा प्रयत्न करेल. याचबरोबर जर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला तर वेस्ट इंडीज विरूद्ध एक मोठे रेकॉर्ड करणार आहेत. तसेच पाकिस्तानच्या (Pakistan) विक्रमाशीही (World Record) भारत बरोबरी करणार आहे. भारताने आतापर्यंत वेस्ट इंडीज विरूद्ध 21 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत.

हेही वाचा: CWG 2022 Ajay Singh: वेटलिफ्टर अजय सिंहचे कांस्य पदक अवघ्या एक किलोने हुकले

भारत सेंट किट्समध्ये यजमान वेस्ट इंडीज विरूद्ध आपला 22 वा टी 20 सामना खेळणार आहे. भारताने वेस्ट इंडीज विरूद्ध खेळलेल्या 21 सामन्यातील 14 सामने जिंकले असून 6 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. एक सामन्याचा निकाल लागला नव्हता.

हेही वाचा: Commonwealth Games 2022 : लॉन बॉलमध्ये भारताचे रौप्य पदक पक्के: महिला संघाने रचला इतिहास

पाकिस्तान वेस्ट इंडीज विरूद्ध टी 20 मध्ये विजय मिळवण्यात आघाडीवर आहे. पाकिस्तानने देखील वेस्ट इंडीज विरूद्ध 21 सामने खेळले असून त्यातील 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर तीन सामन्यात त्यांचा पराभव झाला असून तीन सामन्यांचा निकाल लागला नव्हता. आता आजच्या सामन्यात भारताकडे पाकिस्तानच्या वेस्ट इंडीजला टी 20 मध्ये सर्वाधिकवेळा पराभूत करण्याच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे. याचबरोबर मालिकेतील अजून तीन सामने शिल्लक असल्याने पाकिस्तानचे रेकॉर्ड मोडण्याची देखील भारताला संधी आहे.

Web Title: West Indies Vs India 2nd T20i Team India Have A Chance To Broke Pakistan World Record

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top