esakal | रोहित शर्माला 'वनडे'तील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा, तर विराट कोहलीला...
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

गेल्यावर्षी झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रेक्षकांकडून ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथची हुर्यो उडविण्यात येत असताना विराटने प्रेक्षकांना शांत राहण्यास सांगितले होते. त्याच्या याच कृतीबद्दल त्याला सद्भभावना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

रोहित शर्माला 'वनडे'तील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा, तर विराट कोहलीला...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) आज (बुधवार) वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, भारताचा सलामीवीर रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा तर कर्णधार विराट कोहलीला सद्भावना (Spirit of cricket) हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयसीसीने सर्वोत्तम एकदिवसीय आणि कसोटी संघाचीही घोषणा केली आहे. या दोन्ही संघांचे नेतृत्व विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. या वर्षीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला जाहीर झाला आहे. तसेच कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याची निवड करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्याच मार्नस लाबुशेन याने या वर्षातील सर्वात्तम कामगिरीच्या जोरावर उदयोन्मुख पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. तर, भारताच्या दीपक चहर याला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध 7 धावांत 6 गडी बाद केले होते. स्कॉटलंडच्या कायले कोएत्झर याला संलग्न क्रिकेट मंडळातील सर्वोत्तम पुरस्कार मिळाला आहे. आयसीसीने रिचर्ड इलिंगवर्थ यांना सर्वोत्तम पंचाचा पुरस्कार मिळाला आहे. 

गेल्यावर्षी झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रेक्षकांकडून ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथची हुर्यो उडविण्यात येत असताना विराटने प्रेक्षकांना शांत राहण्यास सांगितले होते. त्याच्या याच कृतीबद्दल त्याला सद्भभावना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वनडे आणि टेस्ट टीमचे नेतृत्व करणाऱ्या विराटसह वनडे संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तर, कसोटी संघात त्याच्यासह सलामीवीर मयांक अगरवालचा समावेश आहे.