Virat vs Rohit | IND vs NZ: 'हिटमॅन'चा किंग कोहलीच्या 'विराट' विक्रमावर डोळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ: 'हिटमॅन'चा किंग कोहलीच्या 'विराट' विक्रमावर डोळा

आजच्या सामन्यात रोहित शर्माला कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी

IND vs NZ: 'हिटमॅन'चा किंग कोहलीच्या 'विराट' विक्रमावर डोळा

IND vs NZ, T20 Series : भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नाही. पण त्यानंतर पहिल्याच मालिकेत उपविजेत्या न्यूझीलंडवर २-० अशी आघाडी घेत भारताने दमदार पुनरागमन केलं. विराटने टी२० विश्वचषकानंतर संघाचे कर्णधारपद सोडलं आणि रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिली मालिका जिंकली. रोहितने मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहेच पण फलंदाज म्हणूनही त्याने आपली भूमिका चोख पार पाडली आहे. आता आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात रोहितचा किंग कोहलीच्या विराट अशा विक्रमावर डोळा आहे.

हेही वाचा: IND vs NZ: T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Rohit-Sharma-Virat-Kohli

Rohit-Sharma-Virat-Kohli

विराट कोहलीने टी२० मालिकेत विश्रांती घेतली आहे. पण रोहित शर्मा मात्र दमदार कामगिरी करताना दिसतोय. पहिल्या सामन्यात रोहितला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याला ४८ धावांवर बाद व्हावे लागले. पण दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार अर्धशतकी मजल मारलीच. त्याने ५५ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या मालिकेतील एकूण १०३ धावांसह रोहितच्या सध्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३ हजार १४१ धावा आहेत. विराट भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (३ हजार २२७) करणारा खेळाडू आहे. त्याला मागे टाकण्यासाठी रोहित आता ८७ धावांनी मागे आहे. आजच्या सामन्यात विराटचा विक्रम मोडण्याची संधी रोहितला आहे.b

दरम्यान, ही मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहली टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पण पहिल्या दोन सामन्यात न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलने अनुक्रमे ७० आणि ३१ धावांची खेळी करत विराटला मागे टाकलं. तसेच, दुसऱ्या सामन्यात रोहितने आपले २५वे टी२० अर्धशतक झळकावत विराटच्या कामगिरीशी बरोबरी केली.

loading image
go to top