Mark Chapman | IND vs NZ: T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND-vs-NZ

IND vs NZ: T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

India vs New Zealand 1st T20I : जयपूरच्या स्टेडियमवर रंगलेल्या टी२० सामन्यात मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमॅन जोडीने न्यूझीलंडला दमदार सुरुवात मिळवून दिली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भुवीने डॅरेल मिशेलला शून्यावर बाद केले पण त्यानंतर गप्टिल आणि चॅपमॅन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. या सामन्यात टी२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एक गोष्ट घडली.

हेही वाचा: IND vs NZ: राहुलने एक चौकार अन् एक षटकार लगावत रचला पराक्रम

मार्क चॅपमॅनने ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची धमदार खेळी केली. त्याच्या खेळीने वेग पकडला होता, पण रविचंद्रन अश्विनने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. दोन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघाकडून खेळताना अर्धशतक ठोकणारा तो टी२० क्रिकेटच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. याआधी त्याने हाँगकाँगच्या संघाकडून खेळताना ओमानविरूद्ध २०१५ साली नाबाद ६३ धावा केल्या होत्या. त्यानंतर बुधवारी न्यूझीलंडकडून खेळताना त्याने अर्धशतकी खेळी केली.

हेही वाचा: IND vs NZ: रोहित-राहुल जोडीचा धमाका; केला धडाकेबाज विक्रम

चॅपमॅन व्यतिरिक्त पहिल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडकडून अनुभवी मार्टीन गप्टीलनेही चांगली खेळी केली. ४२ चेंडूत त्याने ३ चौकार आणि ४ षटकार खेचत ७० धावांची खेळी केली. भारताच्या संघाला मात्र सामन्यात एकच अर्धशतकवीर मिळाला. कर्णधार रोहित शर्माला ४८ धावांवर बाद व्हावे लागले. त्याने ३६ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांच्या साथीने धावा जमवल्या. पण त्यानंतर सूर्यकुमारने दमदार खेळ केला. त्याने ४० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या.

loading image
go to top