विराटला खाली ढकलून रोहित शर्मा Top 5मध्ये; जो रूट अव्वलस्थानी

विराटला खाली ढकलून रोहित शर्मा Top 5मध्ये; जो रूट अव्वलस्थानी

ICC Test Rankings: जेम्स अँडरसनलाही बढती; पाहा ताजी यादी

ICC Test Rankings : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या फारशा चांगल्या लयीत नसल्याचा फटका त्याला ICCने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत बसला. सुरूवातील दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचलेला विराट आता थेट Top 5 मधून बाहेर फेकला गेला. महत्त्वाची बाब म्हणजे भारताचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने विराटला खाली ढकलून पाचवे स्थान पटकावले. त्यामुळे विराट आता फलंदाजांच्या क्रमावारीत सहाव्या स्थानी ढकलला गेला आहे. ताज्या यादीतील आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने मालिकेतील तिसरे शतक झळकावत थेट अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) यानेदेखील दमदार कामगिरीच्या जोरावर Top 5 मध्ये प्रवेश मिळवला आहे.

भारतासाठी तिसरी कसोटी मानहानीकारक पराभवाची असली तरी भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा याला आपल्या झुंजार खेळीचा फायदा झाला. रोहितने पहिल्या डावात १९ आणि दुसऱ्या डावात ५९ धावा करत एका स्थानाची बढती घेतली आणि Top 5मध्ये प्रवेश केला. त्यामुळे विराट कोहली एका स्थानाने घसरून सहाव्या स्थानी विसावला. याशिवाय, चेतेश्वर पुजाराच्या ९१ धावांच्या खेळीमुळे त्याने तीन स्थानांची उडी घेत १५वा क्रमांक पटकावला.

सहा वर्षांनी जो रूट अव्वल

इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने तीनही कसोटी सामन्यात दमदार शतक झळकावली. लॉर्ड्सच्या मैदानावर तर त्याने दीडशतकी खेळी केली. त्यामुळे सध्या भारताविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत तीन सामन्यात १२६.५७च्या सरासरीसह त्याने ५०७ धावा केल्या आहेत. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला मागे टाकत तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावले. रूटव्यतिरिक्त जॉनी बेअरस्टोने पाच स्थानांची बढती मिळवत २४वा क्रमांक पटकावला. तर डेव्हिड मलानने Top 100मध्ये (८८वा क्रमांक) प्रवेश मिळवला.

गोलंदाजीत अँडरसन Top 5 मध्ये

इंग्लंडच्या गोलंदाजांनी ताज्या क्रमवारीत बराच फायदा झाला. भारतीय फलंदाजांना बेजार करणाऱ्या जेम्स अँडरसनने एका स्थानाची बढती घेत पाचवे स्थान मिळवले. ओली रॉबिन्सनने ९ स्थानांची झेप घेत ३६वे स्थान पटकावले. तर क्रेग ओव्हरटनने Top 100मध्ये (७३वा क्रमांक) प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com