Ishan Kishan : कॅप्टन रोहित शर्मा इशान किशनच्या द्विशतकावर पहिल्यांदाच बोलला, म्हणतो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Rohit Sharm

Ishan Kishan : कॅप्टन रोहित शर्मा इशान किशनच्या द्विशतकावर पहिल्यांदाच बोलला, म्हणतो...

Rohit Sharma On Ishan Kishan Double Century : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज इशान किशन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावून सर्वांचा आवडता बनला. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात या डावखुऱ्या फलंदाजाने स्फोटक फलंदाजी करत यजमानांवर टाकलेल्या दबावातून बांगलादेशचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. इशानने द्विशतक झळकावताच अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक केले आहे. आता भारतीय कर्णधार रोहित शर्माने इशान किशनच्या शतकावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: AUS vs WI: ऑस्ट्रेलियाने विंडीजला चारली धूळ! मात्र टीम इंडियाचे वाढले टेन्शन

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळत नव्हता. रोहितने त्याच्या इशानचा फोटो शेअर करून आपल्या खास शैलीत आनंद व्यक्त केला आहे. रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून इशान किशनचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, 'या क्लबची मजा वेगळी आहे. इशान किशन.' यानंतर ईशान किशननेही मजेशीरपणे उत्तर दिले, 'मजेची गोष्ट आहे.' इशान आणि रोहित शर्मा दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. रोहित शर्माच्या आवडत्या खेळाडूंमध्ये इशान किशनची गणना होते.