AUS vs WI: ऑस्ट्रेलियाने विंडीजला चारली धूळ! मात्र टीम इंडियाचे वाढले टेन्शन

Australia vs West Indies 2nd Test
Australia vs West Indies 2nd Testsakal

Australia vs West Indies 2nd Test WTC Points Table : ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023च्या अंतिम फेरीची शर्यत मनोरंजक बनली आहे. ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश केला, आता कांगारूंचे वर्चस्व आहे. संघाने पुढचे काही सामने जिंकले तरी फायनलमध्येही प्रवेश करेल. त्यामुळे टीम इंडियाचे तणाव वाढले आहे.

Australia vs West Indies 2nd Test
FIFA WC22 : पराभवानंतर पोर्तुगालचा 'बेईमानी'चा आरोप, म्हणे ट्रॉफी मेस्सीच्या अर्जेंटिनालाच द्या!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 सीझनच्या पॉइंट टेबलमध्ये सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ 75 टक्के विजय गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 60 टक्के विजय गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 53.33 विजयाची टक्केवारी कायम ठेवली आहे. भारताचा संघ 52.08 विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहे.

पाचव्या स्थानी पाकिस्तान तर सहाव्या स्थानी आता इंग्लंड आहे, कारण वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलियाकडून 0-2 ने मालिका गमावल्यानंतर सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे. सध्या न्यूझीलंड संघ आठव्या स्थानावर आहे, तर बांगलादेश संघ शेवटच्या स्थानावर आहे.

Australia vs West Indies 2nd Test
IND vs BAN: इशान द्विशतकानंतर राहुल द्रविड बनला 'इंदिरानगर का गुंडा', व्हिडिओ व्हायरल

सध्या चार संघांमध्ये अंतिम फेरीची शर्यत सुरू आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया 3 सामन्यांची मालिका आणि त्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल हे त्यावेळेस ठरवेल. तथापि जर ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेला 3-0 किंवा 2-0 किंवा 2-1 ने पराभूत केले तर ते निश्चितपणे अंतिम फेरीत पोहोचतील.

Australia vs West Indies 2nd Test
Ind vs Ban Test Series: 'भरत'च भविष्य बर्बाद करण्यासाठी 'पंत' अकेला ही काफी है!

त्याचबरोबर टीम इंडियाला आधी बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांत आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत त्यांचा पराभव करावा लागेल. असे झाले तरी, संघाची विजयाची टक्केवारी 70 पेक्षा कमी असेल. परंतु अशा परिस्थितीत भारत विजयाच्या टक्केवारीच्या आधारे दक्षिण आफ्रिका संघाला मागे टाकू शकतो आणि भारत पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो, परंतु वेळेसाठी काहीही सांगता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com