Rohit Sharma : 'हिटमॅन'च्या नावावर Asia Cup मधला सर्वात मोठा विक्रम; जयवर्धनेला टाकले मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

  rohit sharma

Rohit Sharma : 'हिटमॅन'च्या नावावर Asia Cup मधला सर्वात मोठा विक्रम; जयवर्धनेला टाकले मागे

Asia Cup Rohit Sharma : आशिया कपमध्ये आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात मोठा विक्रम केला आहे. आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा तो खेळाडू ठरला आहे. हिटमॅनने श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे.

आशिया कपमधील रोहितचा हा 29 वा सामना आहे. जयवर्धनेचा त्याने 28 सामन्यांचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यातही मोठा विक्रम केला होता. तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने न्यूझीलंडचा दिग्गज सलामीवीर मार्टिन गप्टिलला मागे टाकले.

कर्णधार रोहित शर्माने संघात एक बदल केला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामनावीर ठरलेल्या हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी यष्टिरक्षक ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे.

भारत संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.