Hardik Pandya| तो आत्ता खूप शांत आहे...कॅप्टन रोहित शर्मा असं का म्हणाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya

Hardik Pandya: तो आत्ता खूप शांत आहे...कॅप्टन रोहित शर्मा असं का म्हणाला?

भारताने पाकिस्तानचा शेवटच्या षटकात पराभव करत आशिया कपमधील आपला पहिला सामना जिंकला. हार्दिक पांड्याने 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना संपवला. हार्दिकने फिनिशींग कामगिरीने सर्वाच्या मनावर राज्य केले. दरम्यान, रोहित शर्माने सामना संपल्यानंतर हार्दिकचे तोंडभरुन कौतुक केले.

हेही वाचा: Video | Jay Shah : बीसीसीआय अध्यक्ष जय शहांनी तिरंगा हातात घेण्यास दिला नकार

भारताच्या विजयानंतर रोहित शर्माने आनंद व्यक्त केला. तसेच हार्दिकच्या खेळीवरही भाष्य केलं. जेव्हापासून हार्दिकने पुनरागमन केले आहे. तेव्हापासून त्याची कामगिरी धमाकेदार राहिली आहे. जेव्हा तो टीमा हिस्सा नव्हता. त्यावेळी त्याने गंभीरतेने विचार करत आपल्या फिटनेसवर अधिक लक्ष्य दिलं. आता तो 140+ वेगाने सहज गोलंदाजी करत आहे. त्याच्या फलंदाजीचा दर्जा आपल्या सर्वांना माहीत आहे. तो परत आल्यापासून खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तो आता खूप शांत झाला आहे आणि त्याला काय करायचे आहे याबद्दल अधिक आत्मविश्वास आहे, मग तो बॅटने असो वा चेंडूने.

तसेच, पांड्याने गोलंदाजीदेखील कमालीची केली. तो आता चांगली कामगिरी करत आहे. प्रति षटक 10 धावांच्या दबावाचा पाठलाग करताना तुम्ही घाबरू शकता परंतु त्याने ते कधीही दाखवले नाही. अशी प्रतिक्रिया हार्दिकच्या खेळीबद्दल रोहितने दिली

हेही वाचा: Sharad Pawar : पाकिस्तानच्या पराभवानंतर शरद पवारांचा जल्लोष, Video होतोय व्हायरल

यासोबतच, विजयानंतर 35 वर्षीय रोहित शर्माने झालेल्या सामन्यावर भाष्य केलं. ' लक्ष्याच्या पाठलागादरम्यान, आम्हाला माहित होते की आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकू शकतो. आमचा विश्वास होता आणि जेव्हा तुमचा विश्वास असेल तेव्हा या गोष्टी घडू शकतात. हे सहकारी खेळाडूंना स्पष्टता देण्याबद्दल आहे जेणेकरून त्यांना त्यांची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे कळेल. संघाने गेल्या वर्षभरापासून खूप मोठी मजल मारली आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेतले आहे. अशा शब्दात संघातील खेळाडूंचे रोहितने कौतुक केले.

Web Title: Rohit Sharma Praise Hardik Pandya For Fabulous Performance As India Beat Pakistan In Asia Cup

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..