
Axar Patel चे कौतुक करणारे Rohit Sharma चे गुजराती ट्विट व्हायरल
India vs West Indies ODI Series : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने अप्रतिम कामगिरी केली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात संपूर्ण थरार पाहायला मिळाला. अक्षर पटेल टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.
अक्षर पटेलने आपल्या 40व्या एकदिवसीय सामन्यात पहिले अर्धशतक झळकावून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अक्षरने 35 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली आणि धोनीच्या शैलीत षटकार खेचून सामना संपवला. अक्षरची ही खेळी पाहून भारताचा कर्णधार रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया ट्विट केली आहे.(Rohit Sharma and Axar Patel)
हेही वाचा: भारतीय 'स्पीड गन' Navdeep Saini ने इंग्लंडमध्ये केला कहर
अक्षर पटेलच्या मॅचविनिंग इनिंगचे सगळेच चाहते झाले. त्याच्या या खेळीमुळे तो सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माने अक्षरच्या स्तुतीसाठी गुजराती भाषेत एक मनोरंजक ट्विट केले आहे. रोहितने लिहिले, काल रात्री टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. गुजरातीमध्ये ''बापू बढू सारू छे'' असे ट्विट केले आहे. भारतीय खेळाडू अक्षर पटेलला बापूच्या नावाने हाक मारतात.
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी गमावून 311 धावा केल्या. भारतासमोर 312 धावांचे लक्ष्य होते, टीम इंडियाने 49.4 षटकांत 8 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर 63 धावा, संजू सॅमसन 54 धावा आणि अक्षर पटेल 64* धावा केल्या. अक्षर पटेलला प्लेअर ऑफ द मॅचचा किताबही मिळाला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांचा शेवटचा सामना 27 जुलै रोजी होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे.
Web Title: Rohit Sharma Praises Axar Patel Bapu Badhu Saru Che India Vs West Indies 2nd Odi Sports Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..