rohit sharma
rohit sharma

IND vs ENG: रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी केली तयारी सुरू

इंग्लंड विरुद्धची पाचवी आणि शेवटचा कसोटी सामना जरा खासचं

टीम इंडिया जुलैच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक कसोटी सामन्यासाठी जाणार आहे. मार्चमध्ये भारताने या वर्षी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आता जुलैमध्ये कसोटी सामना खेळणार आहे.

भारत इंग्लंड दौऱ्यावर पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळायला जाणार आहे. 2021च्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा हा सामना भाग आहे. गेल्या वर्षीच हा सामना खेळल्या जाणार होता. मात्र कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या कसोटीसाठी तयारी सुरू केली आहे.

rohit sharma
खेलो इंडिया मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचे वर्चस्व

रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली आहे. ज्यामध्ये हिट मॅन मैदानात पळताना दिसत आहे. आयपीएल 2022 संपल्यानंतर रोहित प्रथमच मैदानात उतरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेमधून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. 9 ते 19 जून दरम्यान ही मालिका खेळल्या जाणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे टी-20 संघाचे जबाबदारी सोपवण्यात आले आहे. आफ्रिकानंतर भारतीय संघ आयर्लंडसोबत दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.

rohit sharma
कॅस्पर जेव्हा अजून रॅकेट उचलायला शिकत होता तेव्हा नदालने...

आयपीएल हंगामामध्ये रोहित शर्माची कामगिरी निराशाजनक होती. रोहितने 19.14 च्या सरासरीने केवळ 268 धावा केल्या. रोहितला एकही अर्धशतक करता आलेले नाही. आयपीएलच्या मागील 22 डावांमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. तो 14 डावांपैकी 5 वेळा सिंगल डिजिटवर म्हणजेच 10 पेक्षा कमी धावांवर बाद झाला आहे.

rohit sharma
बॅटिंगने धावांचा पाऊस पाडणारा ज्यो रूट करतोय बॅटवर जादू? पहा Video

1 ते 5 जुलै दरम्यान होणारी इंग्लंड विरुद्धची पाचवी आणि शेवटचा कसोटी सामना जरा खासचं आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. भारताने 2007 नंतर प्रथमच इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिकूं शकते. कसोटी सामन्यानंतर 3 वनडे आणि 3 टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com