Rohit Sharma Injury : भारताला मोठा धक्का! हिटमॅन रोहित मैदानातून थेट रुग्णालयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma Injury

Rohit Sharma Injury : भारताला मोठा धक्का! हिटमॅन रोहित मैदानातून थेट रुग्णालयात

Rohit Sharma Injured : भारत-बांगलादेश वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माला गंभीर दुखापत झाली आहे. क्षेत्ररक्षणादरम्यान, हिटमॅन स्लिपवर उभा होता, तेव्हा एक चेंडू त्याच्या डाव्या हाताला जोरात लागला. या घटनेनंतर रोहित वेदनेने रडताना कॅमेऱ्यात कैद झाला. रोहितच्या हातातूनही रक्त येत होते त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. रोहितला एक्स-रेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा: Babar Azam : 'एवढा मोठा खेळाडू अ्ण...' पत्रकाराने बाबरची सर्वांसमोर व्हिडिओ दाखवत काढली लायकी

बीसीसीआयने ट्विटरवर लिहिले की, 'टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अंगठ्याला दुखापत झाली आहे, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहे आणि सध्या त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले आहे.' रोहितच्या जागी उपकर्णधार केएल राहुल सध्या मैदानावर संघाचे नेतृत्व करत आहे.

हेही वाचा: IND vs BAN : BCCI घेणार कठोर निर्णय! बांगलादेशविरुद्ध मालिका गमावली तर रोहितचे कर्णधारपद...

या घटनेत एकीकडे रोहित शर्मा जखमी झाला, तर दुसरीकडे ब्लू आर्मीला एक विकेट मिळू शकली असती जी मिळाली नाही. सिराजच्या दुसऱ्या षटकात ही घटना घडली. रोहितने हा झेल नीट घेतला असता तर भारताचे दुहेरी नुकसान टाळता आले असते. मात्र, या घटनेनंतर लगेचच सिराजने अनामूलला एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.