Shubman Gill : शंकाच नाही! गिलच्या प्लेईंग 11 मधील समावेशाबाबत रोहितने दिली मोठी हिंट

Shubman Gill
Shubman GillEsakal

Shubman Gill : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती खुद्द कर्णधार रोहित शर्मानेच दिली. त्याने पाकिस्तानविरूद्ध शुबमन गिल खेळण्याची 99 टक्के शक्यता असल्याचे सांगितले.

शुभमन गिल डेंग्यूमुळे वर्ल्डकपमधील पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. मात्र अहमदाबादमधील पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी तो संघात परतला आणि त्याने नेटमध्ये सराव देखील केला.

Shubman Gill
Babar Azam IND vs PAK : बाबर आझमला सामन्यापेक्षा 'या' गोष्टीचं आलंय जाम टेन्शन; पत्रकार परिषदेत म्हणाला...

भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेला सामोरा गेला. यावेळी त्याला शुभमन गिलच्या प्लेईंग 11 मधील समावेशाबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, '99 टक्के शक्यता आहे की शुभमन गिल उद्याचा सामना खेळले. याबाबत आम्ही उद्या सकाळी निर्णय घेऊ.'

शुभमन गिलने या वर्षभरात 20 वनडे सामन्यात 1230 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 72.35 इतकी असून त्याचे स्ट्राईक रेट हे 105 पेक्षा जास्त आहे. त्याने या वर्षभरात आतापर्यंत 5 शतके तर 5 अर्धशतके ठोकली आहेत. त्याने 208 धावांची द्विशतकी खेळी देखील केली आहे.

Shubman Gill
IND vs PAK India Playing 11 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 17 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला रोहित पुन्हा डावलणार?

गेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट्स राखून पराभव केला. भारताने अफगाणिस्तानला 273 धावात रोखले होते. जसप्रीत बुमराहन 39 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या.

रोहित शर्माने 131 धावांची तुफानी खेळी केली होती. इशान किशनने 47 तर विराट कोहलीने 55 धावांची अर्धशतक खेळी करत भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला होता. भारताने 14 षटके राखून विजय मिळवला.

भारतीय संघ :

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com