IND vs PAK : बाबरला सामन्यापेक्षा 'या' गोष्टीचं जाम टेन्शन; सूर्याही भाईलोग म्हणत हातच जोडले

Babar Azam
Babar Azamesakal

Babar Azam IND vs PAK : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मधील सर्वात हाय व्होल्टेज मॅच उद्या (दि. 14) नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. जवळपास लाखभर प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

क्रिकेट वर्तुळातील हा सर्वात तणावपूर्ण सामना असतो. त्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आज पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी पत्रकारांनी बाबर आझमला उद्याच्या सामन्याबद्दल आणि त्या सामन्याच्या दबावाबद्दल अनेक प्रश्न विचारले. बाबरनेही त्याची दिलखुलास उत्तरे दिले.

Babar Azam
IND vs PAK India Playing 11 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 17 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला रोहित पुन्हा डावलणार?

बाबर आझम दबावाबद्दल म्हणाला की, 'सामन्यापेक्षा तिकीटाचाच दबाव जास्त आहे. आमच्यावर सामन्याचा दबाव नाहीये. आम्ही भारतासोबत अनेकवेळा खेळलो आहे. आम्हाला हैदराबादमध्ये चांगला पाठिंबा मिळाला होता. आशा आहे की अहमदाबादमध्येही असाच पाठिंबा मिळेल.'

'सर्वात महत्वाचं आम्ही संघ म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करणं महत्वाचं आहे. भारतात गोलंदाज थोड्यासुद्धा चुका करू शकत नाहीत.'

Babar Azam
Shubman Gill : डेंग्यूमधून सावरत असलेल्या गिलला आयसीसीनं दिलं मोठं गिफ्ट

बाबर आझमपाठोपाठ सूर्यकुमार यादवने देखील तिकीटांसाठी सातत्याने विचारणा होऊ लागल्यानंतर इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत हात जोडले. तो आपल्या स्टोरीत म्हणतो, 'भाईलोग तुमच्या सर्वांच्या घरात चांगले चांगले टीव्ही आहेत. एन्जॉय करा आणि एसी मध्ये बसून सामना पाहा. कृपा करून तिकीटासाठी विनंती करू नका.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com