रोहितने मारली केएल राहुलच्या नावावर फुली; दीड वर्षे वाट पाहिलेल्या क्रिकेटपटूला मिळणार संधी | KL Rahul IND vs AUS Test Series | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul IND vs AUS Test Series

KL Rahul : रोहितने मारली केएल राहुलच्या नावावर फुली; दीड वर्षे वाट पाहिलेल्या क्रिकेटपटूला मिळणार संधी

KL Rahul IND vs AUS Test Series : गुरूवारपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताची प्लेईंग 11 ठरवणे ही रोहित शर्मासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. गोलंदाजीचा प्रश्न तितकासा क्लिष्ट नाही. मात्र फलंदाजीत सलामी जोडी पासून विकेटकिपिंगपर्यंत सगळीकडे रोहितच्या नेतृत्व गुणांचा कस लागणार आहे.

भारताचा स्टार कसोटीपटू ऋषभ पंत अपघातात झालेल्या दुखापतींमुळे संघाबाहेर आहे. वनडेमध्ये केएल राहुल विकेटकिपिंगची धुरा आपल्या खांद्यावर वाहत आहे. तर टी 20 मध्ये इशान किशनकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मात्र कसोटीत पंतची रिप्लेसमेंट शोधणे खूप अवघड काम आहे. वनडे प्रमाणे केएल राहुलच कसोटीत देखील विकेट किपिंग करणार का असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

मात्र संघ व्यवस्थापनाने कसोटीत केएल राहुलकडून विकेटकिपिंग करून घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या परिस्थिती भारतीय संघव्यवस्थापनापुढे दोन पर्याय उरतात. एक इशान किशन आणि दुसरा केएस भरत! इशान किशनने टी 20, वनडे क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आपली दावेदारी सादर केली आहे. तो देखील पंतसारखा डावखुरा फलंदाज आहे.

मात्र टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाने कसोटीसाठी केएस भरतला पहिली पसंती देण्याचे ठरवले आहे. वृद्धीमान सहाचा पर्याय म्हणून केसी भरत गेल्या दीड वर्षापासून भारतीय कसोटी संघासोबत आहे. मात्र त्याला अजूनपर्यंत कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही.

याबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'केएल राहुलला गेल्या वर्षभरात अनेक दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे त्याला कसोटीत विकेटकिपिंग करायला सांगणे योग्य होणार नाही. कसोटीसाठी तज्ज्ञ विकेटकिपरची गरज आहे. भारतीय संघात भरत आणि इशान असे दोन तज्ज्ञ विकेटकिपर आहेत. कोणाला संधी द्यायची हे संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे.'

राहुल द्रविड - रोहित शर्माची केएस भरतला देणार पसंती?

- केएस भरतला भारतीय कसोटी संघात मे 2021 मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

- वृद्धीमान सहाचा पर्याय म्हणून त्याची निवड झाली होती.

- भरत गेल्या दीड वर्षापासून कसोटी पदार्पणाची वाट पाहतोय.

- पंतच्या अनुपस्थितीत भरत आणि इशान किशन यांच्यात कोटीतील विकेटकिपरम्हणून स्पर्धा आहे.

- बीसीसीआयने केएल राहुल कसोटीत विकेटकिपिंग करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

- बऱ्याच काळापासून संयमाने आपल्या संधीची वाट पाहणाऱ्या केएस भरतला इशान किशन आधी संधी मिळण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली