IND vs AUS KL Rahul : व्यंकटेश प्रसाद जिंकणार! अखेर आकाश चोप्रानेच केलं मान्य

IND vs AUS 3rd Test KL Rahul
IND vs AUS 3rd Test KL Rahul esakal

IND vs AUS 3rd Test KL Rahul Aakash Chopra : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील तिसरा कसोटी सामना उद्यापासून इंदूर येथील होळकर स्टेडियमवर सुरू होत आहे. या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन आपली सलामी जोडी बदलणार का याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली होती.

खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलच्या ऐवजी शुभमन गिलला संधी द्यावी अशी मागणी अनेक माजी क्रिकेटपटूंनी केली. अशी आक्रमक मागणी व्यंकटेश प्रसादने देखील केली. मात्र याला आकाश चोप्राने जोरदार विरोध केला. यावरून या दोघांचे ट्विटर वॉर देखील रंगले. आकाश चोप्राने केएल राहुलची बाजू घेतली. त्यानंतर राहुलचा सासरा सुनिल शेट्टीने देखील चोप्राचे ट्विट लाईक करत वातावरण तापवले होते.

मात्र आता समालोचक आकाश चोप्राने व्यंकटेश प्रसादच जिंकणार याचे संकेत दिले. चोप्रा जीओ सिनेमावरील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, 'तिसऱ्या कसोटीसाठीची संभाव्य प्लेईंग 11 ही रोहित शर्मा, पुजारा, विराट, श्रेयस, रविंद्र जडेजा, अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि अकरावा खेळाडू शक्यतो शुभमन गिल असू शकतो. कारण तो कसोटीत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.'

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, 'शुभमन गिलने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात धावा केल्या आहेत. ज्यावेळी केएल राहुलला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवण्यात आल्याची घोषणा झाली. याचा अर्थ तुम्ही आता उपकर्णधार नाहीये तुम्हाला वगळलं जाऊ शकतं. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत हाच एक बदल संभवतो.'

शुभमन गिल सध्या कसोटीत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने डिसेंबर महिन्यात बांगलादेशविरूद्ध आपले पहिले वहिले कसोटी शतक ठोकले होते. यानंतर जानेवारी महिन्यात त्याने न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेत द्विशतक ठोकले. भारताने बॉर्डर - गावसकर ट्रॉफीतील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून ट्रॉफी राखली आहे.

आता ते मायदेशात सलग 16 वी कसोटी मालिका जिंकण्याच्या इराद्याने तिसऱ्या कसोटीत मैदानावर उतरतील. याचबरोबर ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट फिक्स करण्याचाही प्रयत्न करतील.

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com