INDvsSA : रोहित करतोय एकेका सलामीवीरचा पत्ता कट; ठोकले अर्धशतक

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

दक्षिण आफ्रिकेवरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही रोहित शर्माचा धडाका कायम राहिला. त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले आहे. त्याच्या अशा खेळीमुळे त्याने सध्या तरी कसोटी संघात सलामीवीर म्हणून प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक फलंदाजाचा पत्ता कट केला आहे. 

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेवरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही रोहित शर्माचा धडाका कायम राहिला. त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले आहे. त्याच्या अशा खेळीमुळे त्याने सध्या तरी कसोटी संघात सलामीवीर म्हणून प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक फलंदाजाचा पत्ता कट केला आहे. 

INDvsSA : अश्विन; पक्का खडूस अन् विलक्षण प्रॅक्टिकल खेळाडू

रोहितने 72 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटीतील 11वे अर्धशतक आहे. सलामीवीर म्हणून हा त्याचा पहिलाच कसोटी सामना आहे. या कसोटीत पहिल्या डावात त्याने 244 चेंडूंमध्य 176 धावांची आक्रमक खेळी केली होती. या खेळीत त्याने 23 चौकार आणि सहा षटकार खेचले होते. 

गेल्या काही वर्षांपासून मुरली विजय, शिखर धवन यांना कसोटीत आलेले अपयश, पृथ्वी शॉला झालेली दुखापत, त्यानंतर त्याच्यावर आलेली बंदी आणि अगदीच ताजे लोकेश राहुलचे अपयश या सगळ्या अडचणींमुळे रोहितला सलामीला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

INDvsSA : भल्या भल्यांवर भारी ठरले सर जडेजा!

सलामीवीर म्हणून पहिलाच कसोटी सामना खेळताना त्याने शानदार 176 धावांची खेळी केली. याच खेळीसह त्याने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला मागे टाकत अनेक विक्रमही केले. त्यामुळेच आता त्याने लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांचा पत्ता जवळजवळ कट केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma scores half century in 2nd inning of 1st test against South Africa