INDvsSA : सलामीवीर म्हणून रोहितच्या नावावर 'हा' खास विक्रम

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा अध्याय सुरु केला. सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच त्याने शानदार शतक झळकाविले. त्याने खऱ्या अर्थाने हीटमॅन या त्याला दिलेल्या बिरुदाला न्याय दिला आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे.

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा अध्याय सुरु केला. सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच त्याने शानदार शतक झळकाविले. त्याने खऱ्या अर्थाने हीटमॅन या त्याला दिलेल्या बिरुदाला न्याय दिला आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे. याच शतकासह तो कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी20 अशा सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक करणारा एकमेक भारतीय खेळाडू ठरला आहे.

रोहित शर्माने यापूर्वी एकदिवसीय किकेट आणि ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सलामीवीर शतकं झळकाविली होती. आज त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीली उतरत कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकाविले. हे त्याचे सलामीवीर म्हणून कसोटीतील पहिले शतक होते. याच शतकासह तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. 

रोहितने 53व्या षटकांत मुथुसॅमीच्या गोलंदाजीवर 154 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार खेचले. 

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण करताना रोहितने भारतीय मैदानावर दहा सामन्यांमध्ये सर्वाधिक सरासरी नोंदविण्याचा विक्रम केला आहे. त्याने भारतात 91.22च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने सरासरीमध्ये माजी फलंदाज विजय हजारे, कर्णधार विराट, पुजारा अशा सर्वांना मागे टाकले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma sets a new record as an opener