Rohit Sharma : सूर्या असा.. सूर्या तसा.. रोहित SKY बद्दल बरंच काही बोलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma Statement About Surya kumar Yadav After Played Match Wining

Rohit Sharma : सूर्या असा.. सूर्या तसा.. रोहित SKY बद्दल बरंच काही बोलला

Rohit Sharma Statement About Suryakumar Yadav : भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत सुपर 12 ची फेरी अव्वल स्थानवर पोहचत संपवली. भारताने प्रथम फलंदाजी करत झिम्बब्वेसमोर 187 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी करत अवघड स्थितीतून भारताला सावरले होते. सलामीवीर केएल राहुलने देखील 51 धावांची अर्धशतकी खेळी केली तर विराट कोहलीने 26 धावा करत चांगली साथ दिली. दरम्यान, रोहित शर्माने सामना झाल्यावर सूर्यकुमार यादववर स्तुतीसुमने उधळली.

हेही वाचा: Suryakumar Yadav : मॅचपूर्वीची झोप, वानखेडेचं मैदान अन्...; सूर्याने उघड केलं फटकेबाजीमागचं गुपित

रोहित शर्मा सामना जिंकल्यावर म्हणाला की, 'जरी आम्ही सामना सुरू होण्यापूर्वीच सेमी फायनलमध्ये पात्र झालो असलो तरी हा सामना जिंकणे आमच्यासाठी गरजेचे होते. या सामन्यात आम्ही सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी केली. आम्हाला संघाने अशा पद्धतीने खेळणे अपेक्षित होते.'

रोहित पुढे सूर्यकुमार यादवची स्तुती करत म्हणाला की, 'त्याने जे संघासाठी योगदान दिले आहे ते जबरदस्त आहे. तो ज्या प्रकारे खेळतो त्यामुळे समोरच्या बॅट्समनवरचे दडपण दूर होते. ही गोष्ट संघाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. आम्हाला त्याची क्षमता माहिती आहे. त्यामुळे संघातील इतर खेळाडूंना त्यांचा वेळ घेण्याची संधी मिळते. फलंदाजी करताना जो आत्मविश्वास तो दाखवतो त्यामुळे संपूर्ण ड्रेसिंग रूम रिलॅक्स असते.'

हेही वाचा: IND vs ZIM : ग्रुप 2 मध्ये भारतच किंग! पाकिस्तानकडून अव्वल स्थान हिसकावले

याचबरोबर रोहित शर्माने इंग्लंड विरूद्धच्या सामना हा खूप अटीतटीचा होणा असल्याचे सांगितले. तसेच जरी अॅडलेडवर भारतीय संघ यापूर्वी खेळला असला तरी लवकर वातावरणाशी जुळवून घेणे महत्वाचे असल्याचेही तो म्हणाला.