Rohit Sharma Virat Kohli
Rohit Sharma Virat Kohliesakal

रोहित म्हणतो, 'विराट कॅप्टन असताना संघासाठी संदेश स्पष्ट असायचा'

मुंबई : रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) नवा कर्णधार असणार आहे. तो आपल्या पूर्णवेळ कर्णधार म्हणून कारकिर्दिची सुरुवात आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून (India Tour Of South Africa) करणार आहे. रोहित शर्मा या दौऱ्याच्या तयारीला लागला आहे. दरम्यान, त्याने भारताचा माजी एकदिवसीय कर्णधार विराटकोहलीबद्दल (Virat Kohli) अनेक वक्तव्ये केली. रोहित शर्माचा हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर पोस्ट केला आहे. (Rohit Sharma Statement About Virat Kohli Captaincy)

Rohit Sharma Virat Kohli
पाकने ८८९ कमांडो केले तैनात; मात्र कोरोनाने केला घात

रोहित म्हणाला (Rohit Sharma) 'विराट कोहलीने (Virat Kohli) संघ अशा स्तरावर नेऊन ठेवला की तेथून आम्ही मागे वळून पाहिलेच नाही. गेल्या पाच वर्षात त्याने भारतीय संघाचे नेतृत्व करताने तो ज्या ज्या वेळी मैदानात उतला त्या त्या वेळी त्याने लीड फ्रॉम द फ्रंट वृत्तीनेच नेतृत्व केले. त्यावेळी संघासाठी स्पष्ट संदेश असायचा, प्रत्येक सामना जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावायची. प्रत्येक सामना जिंकायचाच प्रयत्न करायचा.'

रोहित पुढे म्हणाला की, 'आम्ही विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात खेळाताना खूप चांगल्या आठवणी तयार झाल्या. मी त्याच्या नेतृत्वाखाली बरेच क्रिकेट खेळलो आहे आणि त्यावेळी मी प्रत्येक क्षण एन्जॉय केला. मी अजूनही ते करत आहे.'

Rohit Sharma Virat Kohli
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ऋतुराज, व्यंकटेशला मिळणार संधी?

एकदिवसीय संघाची धुरा हातात घेतलेल्या रोहित संघाबाबत म्हणाला, 'आम्हाला संघ म्हणून आणि खेळाडू म्हणूनही अजून सुधारणा करण्यास वाव आहे. फक्त मी नाही तर संपूर्ण संघ याच्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. आम्ही एक संघ म्हणून उत्तम होण्यावर भर देणार आहोत.'

यापूर्वी रोहित शर्माने (Rohit Sharma) ३२ एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. आता त्याच्याकडे एकदिवसीय आणि टी २० संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद आल्यावर त्याने आपल्याला आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला 'मला ही संधी दिल्याबद्दल मी सन्मानित आणि कृतज्ञ आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे. मी याबाबत खूप आनंदी आहे. हा रोमांचक प्रवास असणार आहे.' (Team India New ODI Captain)

Rohit Sharma Virat Kohli
Ashes | अ‍ॅडलेड कसोटीपूर्वी ऑस्टेलियाला मोठा धक्का; हेजलवूड आऊट

तो पुढे म्हणाला की, 'ज्या ज्या वेळी मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मी गोष्टी साध्या सोप्या ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यातील महत्वाची गोष्ट होती ती खेळाडूंबरोबर संवाद साधणे आणि त्यांना त्यांची भुमिका स्पष्ट करून सांगणे. एक कर्णधार (Captain) आणि प्रशिक्षक म्हणून खेळाडूंशी संवाद साधत त्यांना त्यांच्या भुमिकेबाबत समजावून सांगणे महत्वाचे असते.'

तो पुढे म्हणाला की, 'मी सुद्धा हेच करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे खेळाडूंना त्यांना संघात कोणती भुमिका बजावण्यास घेतले आहे हे स्पष्टपणे समजेल. त्यांना एक खेळाडू म्हणून काय करायचे आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com