Rohit Sharma : रोहितकडून राहुल द्रविड यांना मानवंदना

क्रिकेट जगतात खेळाडू म्हणून दि वॉल हा बहुमान मिळवलेल्या राहुल द्रविड यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून वेगळे स्थान निर्माण केले.
Rohit sharma tribute to Rahul Dravid after t20 world cup
Rohit sharma tribute to Rahul Dravid after t20 world cup Sakal

क्रिकेट जगतात खेळाडू म्हणून दि वॉल हा बहुमान मिळवलेल्या राहुल द्रविड यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून वेगळे स्थान निर्माण केले. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत अजिंक्यपद मिळवल्यानंतर त्यांनी आपल्या या जबाबदारीचीही सांगता केली. राहुल-रोहित या जोडीने अनेक चढ-उतारानंतर अखेर विश्वकरंडक यशाची उंची गाठली... राहुल द्रविड बंगळूरमध्ये परतले... रोहित शर्मा कुटुंबासह सुटीवर परदेशात गेला; पण तेथून त्याने आपला मित्र, प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी हृदयस्पर्शी भावना शब्दबद्ध केली.

प्रिय राहुल भाई...

तुझ्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी मी अचूक आणि योग्य शब्दांचा शोध घेतोय. मात्र, मला ते शक्य होईल, असे वाटत नाही. तरीही मी प्रयत्न करतोय... करोडो युवकांप्रमाणे मीसुद्धा लहानपणापासून तुला आदर्श मानतोय; परंतु मला तुझ्यासोबत खेळायला मिळाले आणि आता संघाची सेवा करायला मिळाली हे माझे भाग्य समजतो.

तू खरोखरच क्रिकेट या खेळाचा दिग्गज आणि महान खेळाडू आहेस; परंतु वैयक्तिक मोठेपणा आणि यश उंबरठ्याच्या बाहेर ठेवून तू भारतीय संघाचा प्रशिक्षक झालास आणि एक आमच्यासह एका समान उंचीवर आलास, जेणेकरून आम्हाला निःसंकोच तुझ्याशी मोकळेपणे बोलता येईल, असे वातावरण तयार केलेस, ही तू आम्हाला दिलेली पहिली सर्वात मोठी भेट होती.

सर्व काही मिळवल्यानंतरही तुझा विनम्रपणा आणि तुझे खेळाबद्दल असलेले प्रेम कायम आहे. तुझ्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आणि त्यातील प्रत्येक क्षण प्रेमळ आठवण म्हणून कायम माझ्यासोबत राहणार आहे.

माझी पत्नी तुला क्रिकेटमधील माझी पत्नी म्हणून विनोदाने संबोधायची. अजूनपर्यंत तू मिळवलेल्या यशाच्या तिजोरीत एक गोष्टीची कमतरता होती ती आपण सर्वांनी मिळून कमवली... राहुल भाई, माझा आत्मविश्वास... माझा मित्र आणि माझा प्रशिक्षक असा आदर तुझ्याबद्दल व्यक्त करणे हा माझ्यासाठी मनापासून फार मोठा सन्मान आहे.

--तुझा, रोहित शर्मा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com