न्यूझीलंडमध्ये जे आतापर्यंत कोणी केले नाही, ते रोहित करणार?

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी20 मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याचा इतिहास घडविण्याची संधी आहे. 

वेलिंग्टन : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी20 मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याचा इतिहास घडविण्याची संधी आहे. 

भारताने आजवर न्यूझीलंडमध्ये केवळ एक द्विपक्षीय ट्वेंटी20 मालिका खेळली आहे. 2008-09 मध्ये झालेल्या या मालिकेत किवींनी भारताचा 2-0 अशा पराभव केला होता. त्याचवेळी झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने 3-1 असा विजय मिळवला होता. 

न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी20 मालिका खेळणे भारतासाठी नेहमीच अवघड राहिले आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्ध 2017-18 पर्यंत एकही ट्वेंटी20 सामना जिंकला नव्हता. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात झालेल्या आठ सामन्यांपैकी भारताने केवळ दोन सामने जिंकले आहेत. आतापर्यंत संघाच्या नेतृत्वाची धुरा उत्कृष्टरित्या सांभाळली आहे. अशातच त्याला आता भारताचा कर्णधार या नात्याने त्याला न्यूझीलंडमध्ये इतिहास घडविण्याची संधी आहे. 

Web Title: Rohit Sharma is on verge of creating history in New zealand