India vs New Zealand ODI Series 2026 Playing XI Prediction
esakal
Rohit Sharma and Virat Kohli return to international cricket as India face New Zealand : मायदेशात होत असलेली टी-२० विश्वकरंडक स्पर्धा काही दिवसांवर आलेली आहे, या प्रकारातून निवृत्त झालेले असले तरी येत्या आठवड्यात पुन्हा एकदा चर्चा रोहित शर्मा-विराट कोहली (रो-को) यांचीच होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. बीसीसीआयच्या निर्देशानुसार रोहित आणि विराट हे विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत प्रत्येकी दोन सामने खेळलेले आहेत. त्यातून त्यांच्या भोवती होणारी चर्चा कायम राहिली आहे. आता पुन्हा एकदा ते केंद्रस्थानी असतील.