esakal | बलात्काराचा आरोप रोनाल्डोने फेटाळला 
sakal

बोलून बातमी शोधा

Ronaldo denies rape charges

लासवेगासमधील एका हॉटेलात 2009 मध्ये कॅथरिन मायोर्गानामक अमेरिकी महिलेवर जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो याने बलात्कार केल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी फेटाळून लावला.

बलात्काराचा आरोप रोनाल्डोने फेटाळला 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पॅरिस- लासवेगासमधील एका हॉटेलात 2009 मध्ये कॅथरिन मायोर्गानामक अमेरिकी महिलेवर जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो याने बलात्कार केल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी फेटाळून लावला.

नाईट क्‍लबमध्ये रोनाल्डोची भेट झाली. त्यानंतर त्याने पेंटहाऊसमध्ये बलात्कार केला आणि मग माफी मागितली. नंतर त्याने तीन लाख 75 हजार डॉलर रक्कम देऊन समेट करण्याचा प्रस्ताव ठेवला. तो भीतीपोटी मान्य केला. माझ्यावर काय प्रसंग आला हे कुणाला कळू नये असे वाटत होते.

मला सुनावणी नको होती, असा कॅथरिनचा आरोप होता. एका मासिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले. त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल, असेही वकील ख्रिस्तियन श्‍चेर्त्ज यांनी सांगितले.

loading image
go to top