Ronaldo Vs Messi : पुन्हा मेस्सीचं ठरला वरचढ ! 2 गोल करूनही रोनाल्डो पडला फिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ronaldo Vs Messi

Ronaldo Vs Messi : पुन्हा मेस्सीचं ठरला वरचढ ! 2 गोल करूनही रोनाल्डो पडला फिका

रियाध : कतार विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेनंतर सर्वात चर्चेचा विषय ठरलेल्या लिओनेल मेस्सी विरुद्ध ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील स्कोअर रोनाल्डो २ मेस्सी १ असा झाला; परंतु रोनाल्डोच्या सौदी ऑल स्टार संघाला मेस्सीच्या पीएसजीविरुद्ध ४-५ अशी हार स्वीकारावी लागली.

२०२० नंतर मेस्सी आणि रोनाल्डो एकमेकांविरुद्ध खेळले. त्यामुळे या लढतीची उत्सुकता कमालीची होती. रोनाल्डो आता सौदीच्या क्लबशी करारबद्ध आहे, तर पीएसजी या क्लबची मालकी सौदीतील अरब उद्योगपती नसीर अल खैलेफी यांच्याकडे आहे. त्यामुळे आजची ही मैत्रीपूर्ण लढत शक्य झाली. भारताचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन सामन्याचे प्रमुख पाहुणे होते.

मेस्सी-एम्बापे-नेमार असे स्टार असलेल्या पीएसजीकडून मेस्सीने सुरुवातालीच लाजवाब मैदानी गोल केला. त्यानंतर त्याने एम्बापेला अचूक पास दिला, परंतु त्याला गोल करता आला नाही. नेमारने तर पेनल्टी वाया घालवली.

रोनाल्डोने मात्र पेनल्टीवर संधी साधल्यावर दुसरा गोल आपल्या कौशल्यावर साधला. पीएसजीच्या बर्नाटला रेड कार्ड मिळाल्यामुळे पीएसजीचा संघ १० खेळाडूंसहच खेळत होता. एम्बापेने अखेर पेनल्टीवर गोल केल्यानंतर ६० व्या मिनिटानंतर त्याच्यासह मेस्सी-नेमार आणि रोनाल्डो या सर्वांना विश्रांती देण्यात आली.