मी तर मेस्सीपेक्षा सरसच ः रोनाल्डो

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मी लिओनेल मेस्सीपेक्षा वेगळा आहे. मी वेगवेगळ्या क्‍लबकडून खेळलो आणि चॅम्पियन्स लीग जिंकली आहे, असे सांगत ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपण लिओनेल मेस्सीपेक्षा सरस असल्याचा दावा केला.

पॅरिस : मी लिओनेल मेस्सीपेक्षा वेगळा आहे. मी वेगवेगळ्या क्‍लबकडून खेळलो आणि चॅम्पियन्स लीग जिंकली आहे, असे सांगत ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपण लिओनेल मेस्सीपेक्षा सरस असल्याचा दावा केला.

रोनाल्डोचा युव्हेंटिस गतमोसमात चॅम्पियन्स लीगमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाला होता. त्याने स्पर्धेत सर्वाधिक गोलचा विक्रम केला आहे. त्याने युव्हेंटिसला जाण्यापूर्वी रेयाल माद्रिदला चॅम्पियन्स लीग विजेते केले होते. तसेच त्याने मॅंचेस्टर युनायटेडच्या चॅम्पियन्स लीग विजेतेपदातही मोलाचा वाटा उचलला आहे.

सलग सहा मोसमात मी चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक गोल केले होते. पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे या स्पर्धेबरोबर माझे नाते घट्ट आहे, असे रोनाल्डोने सांगितले.

गेली बारा वर्षे रोनाल्डो सरस की मेस्सी ही चर्चा सुरू आहे. 2008 ते 2017 दरम्यान या दोघांनीच वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचे बक्षीस जिंकले.

रोनाल्डोने मेस्सीचे कौतुकही केले. मेस्सीही उत्तम खेळाडू आहे. तो सर्वोत्तम ठरलाही आहे; पण त्याचबरोबर त्याच्या खेळात प्रत्येक वर्षागणिक माझ्याप्रमाणेच सुधारणा होत आहे, असेही रोनाल्डो म्हणाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ronlado claimed he is better than messi