MIW vs RCBW : आरसीबीने रचला वाईट इतिहास! 'अशी' कामगिरी करणारी ठरली WPL मधील पहिली टीम

WPL 2023 MIW vs RCBW
WPL 2023 MIW vs RCBW esakal
Updated on

WPL 2023 MIW vs RCBW : रॉयल चॅलेंजर बेंगलोरने मुंबई इंंडियन्सविरूद्ध दमदार सुरूवात केली. मात्र त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी आरसीबीचे 4 फलंदाज अवघ्या 2 षटकात गारद करत सामन्यावर आपली पकड पुन्हा निर्माण केली. मात्र आरसीबीच्या मधल्या फळीतील रिचा घोष (28), कनिका अहुजा (22) श्रेयांका पाटील (23) यांनी आरसीबीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले.

मुंबईने आरसीबीला 155 धावात रोखले. मुंबईकडून हेले मॅथ्यूजने 3 तर सैका इशाक आणि एमेलिया केर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे रॉयल चॅलेंजर बेंगलोर ही Women's Premier League च्या पहिल्या हंगामातील पहिल्या डावात ऑल आऊट होणारी पहिली टीम ठरली.

WPL 2023 MIW vs RCBW
Smriti Mandhana : स्मृती नुसतीच आरंभशूर! दमदार सुरूवातीनंतर स्टार मानधनाने कच खाल्ली

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर स्मृती मानधनाने आक्रमक फटकेबाजी करत पहिल्या चार षटकात 35 धावांपर्यंत मजल मारून दिली. तिला दुसऱ्या बाजूने सोफी डिवाईन चांगली साथ देत होती. आता वाटले की आरसीबी आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारणार.

मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या दोन षटकात हे सगळं चित्र पाटलं. डावखुरी फिरकी गोलंदाज सैकी इशाकने पाचव्या षटकात 16 धावांवर डिवाईनला बाद केले. त्यानंतर त्याच षटकात दिशा कसातला शुन्यावर बाद करत दुसरा धक्का दिला.

दोन धक्क्यानंतर डाव सावरण्यासाठी हेथर नाईट क्रीजवर आली होती. दुसरीकडे स्मृती मानधनाने 17 चेंडूत 23 धावा करत चांगली सुरूवात करून दिली होती. मात्र सहाव्या षटकात हेली मॅथ्यूजने आरसीबीला पुन्हा दोन धक्के दिले. तिने आक्रमक फटकेबाजीच्या नादात असलेल्या स्मृतीला झेलबाद केले. त्यानंतर हेथर नाईटचा शुन्यावर त्रिफळा उडवला.

WPL 2023 MIW vs RCBW
Sunil Gavaskar IND vs AUS : म्हणून भारताने फिरकीला पोषक खेळपट्ट्या तयार केल्या... गावसकरांनी ठेवलं वर्मावर बोट

यानंतर अनुभवी एलिस पेरी आणि युवा रिचा घोषने आरसीबीचा डाव आक्रमकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी दोन षटकात 28 धावांची भागीदारी रचत संघाला 9 व्या षटकात 71 धावांपर्यंत पोहचवले. मात्र पेरी 7 चेंडूत 13 धावा करून बाद झाली.

आरसीबीचा निम्मा संघ गारद झाल्यानंतर 19 वर्षाची रिचा घोष आणि कनिका अहुजा या जोडीने डाव सावरत 12 षटकात आरसीबीचे शतक धावफलकावर लावले. मात्र अनुभवी पूजा वस्त्रकारने 13 चेंडूत 22 धावा करणाऱ्या कनिका अहुजाला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर रिचा देखील 25 चेंडूत 28 धावा करून बाद झाली.

रिचा बाद झाल्यानंतर श्रेयांका पाटीलने मेगन स्कॉट्सच्या साथीने आरसीबीला 150 च्या जवळ पोहचवले. मात्र श्रेयांकाची 15 चेंडूत केलेली 23 धावांची इनिंग नॅट सिवर ब्रंटने संपवली. यानंतर आरसीबीचा डाव 155 धावात संपुष्टात आला.

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com