Sunil Gavaskar IND vs AUS : म्हणून भारताने फिरकीला पोषक खेळपट्ट्या तयार केल्या... गावसकरांनी ठेवलं वर्मावर बोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Gavaskar IND vs AUS

Sunil Gavaskar IND vs AUS : म्हणून भारताने फिरकीला पोषक खेळपट्ट्या तयार केल्या... गावसकरांनी ठेवलं वर्मावर बोट

Sunil Gavaskar IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील तीन कसोटी सामने झाले आहेत. या तीनही कसोटी सामन्यात फिरकीपटूंचाच बोलबाला राहिला आहे. यातील एकही कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला नाही, यापूर्वीच कसोटी संपुष्टात आली. भारतातील खेळपट्ट्यांची चर्चा जगभर झाली. याबाबत अनेकांनी टिका केली तर अनेकांनी समर्थन केले.

मात्र भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकरांनी भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांच्या ऐवजी फिरकीला साथ देण्याच्या खेळपट्ट्या का तयार केल्या याचे कारण सांगितले.

गावसकर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले की, 'भारतात 20 विकेट्स घेणं सोपं नाही. भारतातील जास्तीजास्त खेळपट्ट्यांवर तुमचे प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांची अनुपस्थिती मोहम्मद सिराज तुलनेने कमी अनुभवी आहे. अशा परिस्थितीत भारताची गोलंदाजी दमदार रहात नाही. मात्र कोरड्या खेळपट्टींच्या मदतीने भारत सामन्यात 20 षटके घेणे शक्य आहे. मला वाटेत की फिरकीला साथ देणारी खेळपट्टी करण्यामागे हेच कारण असावे.'

भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्याबाबत सुनिल गावसकर म्हणतात, 'भारताकडे WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. जर भारताकडे जर चांगला वेगवान मारा करणारा बॉलिंग अटॅक असता तर आपण कदाचित काही वेगळं केलं असतं.'

'मात्र आपले बलस्थान फिरकी आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या. तुम्ही पाटा खेळपट्टी करून फलंदाजांना दबदबा निर्माण करू इच्छित नाही. या खेळपट्ट्या फलंदाजांचे कौशल्य तपासून पाहतात.'

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....