
IPL 2021 : RCB चा 'विराट' प्लॅन; UAE तील लढतींसाठी तगडी रिप्लेसमेंट
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मास्टर प्लॅन आखलाय. दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेपूर्वी त्यांनी तीन बदली खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. आरसीबीने (RCB) श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदु हसरंगा, दुष्मंत चमीरा आणि टिम डेविडला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे. हसरंगाला एडम झम्पाच्या जागी संघात स्थान मिळाले असून फिन एलेनच्या जागी टिम डेविडला संघात घेण्यात आले आहे. दुष्मंत चमीरा डॅनियल सॅम्सची रिप्लेसमेंट असेल.
आयपीएल 2021 स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात स्पर्धेतील उर्वरित 31 सामने युएईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात होणार आहे. वानिंदु हसरंगा याने भारताविरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. वनडे आणि टी-20 मालिकेत त्याने 7 विकेट घेतल्या होत्या.
हेही वाचा: IPL 2021: मास्कच्या आत स्माइली घेऊन दिल्लीकर UAE त पोहचले
ऑस्ट्रेलियन फिरकीपटू एडम झम्पाने कोरोनाच्या संकटात भारतात नियोजित केलेल्या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर त्याने उर्वरित सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागेवर हसरंगा बंगळुरुच्या ताफ्यात सामील झालाय. फिन एलनला न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात जागा मिळाली आहे. आयपीएलदरम्यान न्यूझीलंडचा संघ बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे एलन उर्वरित आयपीएलसाठी उपलब्ध राहणार नाही. त्याची जागा टिम डेविडने घेतली आहे. केन रिर्चड्सन आणि डॅनियल सॅम्स यांनी देखील आयपीएलमधील उर्वरित स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतलाय.
हेही वाचा: पाकिस्तानला अफगाणिस्तानवर भरवसा नाही; वनडे मालिका संभ्रमात
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 14 व्या हंगमातील पहिल्या टप्प्यात दमदार कामगिरी केलीये. त्यांनी 7 सामन्यातील 5 सामन्यात विजय नोंदवलाय. विराटच्या नेतृत्वाखाली जेतेपद मिळवण्यात संघ यशस्वी ठरणार की पुन्हा त्यांच्या पदरी ' ये रे माझ्या मागल्या...' म्हण वाट्याला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Web Title: Royal Challengers Bangalore Includes Wanindu Hasaranga Tim David And Dushmantha Chameera As Replacement Of Adam Zampa Daniel Sams For Ipl 2021 Uae
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..