कोरोनामुळे आर पी सिंहला पितृशोक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rp singh and  shiv prasad singh

कोरोनामुळे आर पी सिंहला पितृशोक

भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज रुद्रप्रताप सिंह (RP Singh) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. त्याचे वडिल शिव प्रसाद सिंह (Shiv Prasad Singh) यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. लखनऊमधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आरपी सिंहने वडिलांच्या निधनाची दु:खद वार्ता शेअर केलीये. टी20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य राहिलेल्या आरपी सिंगने वडिलांच्या आत्माला शांती लाभावी, यासाठी प्रार्थना करावी, अशी भावनाही व्यक्त केली आहे. आरपी सिंगने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो अनेक सामन्यात कॉमेंट्री करताना दिसते.

हेही वाचा: 'आधारस्तंभ गमावला', वडिलांच्या निधनानंतर पीयूष चावलाची पोस्ट

ट्विटरवरुन दिली माहिती

आरपी सिंहने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक ट्विट केले आहे. यात त्याने लिहिलंय की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. 12 मे रोजी ते आपल्या सर्वांच्यातून निघून गेले. ते कोरोना विषाणूचा सामना करत होते. RPI पापा ॐ नमः शिवाय।' असा उल्लेखही त्याने ट्विटमध्ये केला. भारतीय संघाचा माजी अष्टपैलून इरफान पठाण आणि पार्थिव पटेल यांनी या ट्विटर प्रतिक्रिया दिली असून आरपी सिंहसोबतच्या दु:खात सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: आईसह बहीणसुद्धा गेली, कोरोनाने वेदावर कोसळला दु:खाचा डोंगर

काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील चेतन सकारिया याचे वडिल कांजीभाई यांचे कोरोनाने निधन झाले होते. पियुष चावलाच्या वडिलांनीही कोरोनामुळे आपला जीव गमावला होता. भारतीय महिला क्रिकेटर वेदा कृष्णमूर्ती हिच्या कुटुंबियातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्तही धक्का देणारे असेच होते. वेदाने आपल्या आईसह बहीणीला कोरोनामुळे गमावले होते.

rp singh father shiv prasad singh dies due to coronavirus

Web Title: Rp Singh Father Shiv Prasad Singh Dies Due To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Cricketer
go to top