टीम इंडियाचा भ्रमाचा भोपळा फुटला; आफ्रिकेनं पिछाडीवरुन मारली बाजी| SA vs IND 3rd Test Final Result | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RSA vs IND 3rd Test Day 4 Live Update Score Keegen Petersen
RSA vs IND LIVE: कीगनचा काटा कोण काढणार?

टीम इंडियाचा भ्रमाचा भोपळा फुटला; आफ्रिकेनं पिछाडीवरुन मारली बाजी

केपटाऊन : डिन एल्गरच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाने पिछाडीवरून दमदार कमबॅक करत भारतीय संघाच्या स्वप्नाचा चक्काचुरा केला. सेंच्युरीयनचं मैदान मारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचं मैदान सहज फत्तेह करुन आस भ्रमात राहिलेल्या टीम इंडियाला जोहन्सबर्ग आणि केपटाऊनमध्ये धूळ चारत आफ्रिकेनं आपला गड सुरक्षित राखला. भारतीय संघाला आतापर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकता आलेली नाही. पहिला सामना जिंकून टीम इंडियाने सुरुवात दमदार केली खरी पण, मालिका जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. (RSA vs IND 3rd Test Day 4 Update Score Keegen Petersen)

तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी घोर निराश केले. पहिल्या डावात भारतीय संघाने 223 धावा केल्या. त्यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव 210 डावात आटोपून त्यांनी सामना बरोबरीत आणला खरा. पण दुसऱ्या डावातही आघाडीच्या फलंदाजीनं नांगी टाकली. रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने कशीबशी 198 धावांपर्यंत मजल मारली. या धावांच्या आधारे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मार्करम 16, एल्गर 30 धावा करुन परतल्यानंतर भारतीय संघ सामन्यात पुन्हा कमबॅक करेल असे वाटले होते. पण कीगन पीटरसनने 82 धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. शार्दुल ठाकूरने त्याची विकेट घेतली त्यावेळी सामना आफ्रिकेच्या बाजूनं झुकला होता. रेस्सी व्हॅन डर दुसेन याने 95 चेंडूत नाबाद 42 तर तेम्बा बवुमानं 58 चेंडूत 32 धावांची खेळी करत संघाला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर मोहम्मद शमीने मार्करमला स्वस्तात माघारी धाडत चांगली सुरुवात केली. मात्र कर्णधार डीन एल्गर आणि कीगन पिटरसन या दोघांनी चिवट फलंदाजी करत भारताला विकेटसाठी तरसवले.

अखेर जसप्रीत बुमराहने डीन एल्गरची 30 धावांची खेळी संपवत भारताला दिलासा दिला होता. मात्र अजूनही कीगन पिटरसन (Keegen Petersen) दिवस अखेरपर्यंत 48 धावा करुन नाबाद होता. त्याच्या या खेळीच्या जोरावरच आफ्रिकेने तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली होती. उर्वरित 111 धावा करण्यासाठी आफ्रिकेनं केवळ एक विकेट गमावली.

  • Lunch Break : दक्षिण आफ्रिकेच्या ३ बाद १७१ धावा, दुसेन २२ तर बाऊमा १२ धावा करुन नाबाद. विजयासाठी फक्त ४१ धावांची गरज

155-3 : शार्दुल ठाकूरने जोडी फोडली, कीगन पिटरसन ८२ धावांवर बाद

  • भारत पराभवाच्या छायेत, आफ्रिकेला विजयासाठी हव्या फक्त ५७ धावा

  • RSA 154-2 : आफ्रिका १५० पार, पिटरसनने देखील शतकाच्या जवळ

  • कीगन पिटरसनचे अर्धशतक पूर्ण, आफ्रिकेला विजयासाठी ९४ धावांची गरज

  • भारत दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी मालिका विजयापासून ८ विकेट आहे दूर

  • ४८ धावा करणारा कीगन पिटरसन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर

  • चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिका आपला दुसरा डाव २ बाद १०१ धावांपासून खेळणार पुढे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top