esakal | कुस्तीच्या आखाड्यासाठी 5 वर्षांनंतर सत्ताधारी-विरोधक 'एकत्र'
sakal

बोलून बातमी शोधा

Wrestling

कुस्तीच्या आखाड्यासाठी सुपनेतील सत्ताधारी-विरोधक मंडळी मतभेद विसरुन एकत्र आली आहेत.

कुस्तीच्या आखाड्यासाठी 5 वर्षांनंतर सत्ताधारी-विरोधक 'एकत्र'

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : सुपने (Supne Village) हे कुस्तीची परंपरा जपणारे गाव आहे. त्या गावातील मल्लांसाठी अद्यावत कुस्ती केंद्र, क्रीडा संकुल (Wrestling Center Sports Complex) सुरु करावे, या मागणीसाठी सुपनेतील सत्ताधारी आणि विरोधक मंडळी मतभेद विसरुन एकत्र आली. त्यांनी खासदार श्रीनिवास पाटील (MP Shriniwas Patil) यांना साकडे घालून संकुलाची मागणी केली. त्याला प्रतिसाद देत खासदार पाटील यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) आणि मी दोघे मिळून मदत करु, अशी ग्वाही सुपनेकरांना दिली.

सुपने गावाजवळून कोयना नदी वाहत असल्याने गाव बागायती आहे. त्यामुळे त्या गावात साधनता आहे. त्यातूनच गावातील अनेक ग्रामस्थांनी आपल्या मुलांना तालमीत घालून त्यांना चांगले पैलवान घडवण्यासाठी योगदान दिले. त्या गावात कुस्तीची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. श्रावणातील शेवटच्या सोमवारनंतर गावाची यात्रा भरते. त्या गावातील यात्रेत गेल्या अनेक वर्षांपासून कुस्तीचे मैदान भरवण्यात येते. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यातून गावातील अनेक मल्लांनी राज्यस्तरीय मैदानात बाजी मारुन गावाचे नाव मोठे केले आहे. त्या गावातील तरुण मल्लांना आखाडा, अद्ययावत कुस्ती केंद्र क्रीडा संकुल सुरु करावे, यासाठी गावातील नेते प्रकाश पाटील, बलराज पाटील, अॅड. राहुल पाटील, शिवाजी पाटील, सरपंच अशोक झिंब्रे, अरुण पाटील, पैलवान प्रशांत पाटील, गणेश पाटील, शिवाजीराव गायकवाड, साहेबराव गायकवाड आदी सत्ताधारी व विरोधक आज एकत्र आले.

हेही वाचा: दीड हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका! मुदतवाढ संपली

Shriniwas Patil

Shriniwas Patil

त्यांनी खासदार पाटील यांना भेटून कुस्ती केंद्र, क्रीडा संकुलासाठी साकडे घातले. खासदार पाटील यांनाही गावातील उदयोन्मुख मल्लांसाठी सत्ताधारी-विरोधक एकत्र आल्यामुळे, एकमुखी मागणी केल्यामुळे समाधान वाटले. खासदार पाटील यांनी सुपनेकरांचे म्हणने ऐकूण घेवून त्यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मी दोघेजण समन्वय साधून क्रीडा संकुल मंजूर व्हावे यासाठी प्रयत्न करतो, असे आश्वासन देत सुपने गावातील मल्लांना काही कमी पडून देवू नका, असा वडीलकीचा सल्लाही दिला. त्यावर सुपनेकरांनीही समाधान व्यक्त केले.

loading image
go to top