esakal | दीड हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका! मुदतवाढ संपली
sakal

बोलून बातमी शोधा

Co-operative society elections

जिल्हा बॅंकांच्या निवडणुकीनंतर टप्प्याटप्प्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा विचार सहकार विभागाचा आहे.

दीड हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका! मुदतवाढ संपली

sakal_logo
By
- उमेश बांबरे

सातारा: कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सर्वत्र लॉकडाउन पूर्णपणे शिथिल केले आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सुमारे दीड हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा बॅंकांच्या निवडणुकीनंतर टप्प्याटप्प्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा विचार सहकार विभागाचा आहे. त्याची सुरुवात गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीपासून होणार आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा: सातारा शहराचे होणार गुगल मॅपिंग! नगरपालिकेची तयारी

कोरोनाच्या महामारीपासून वाचण्यासाठी राज्यभरात लॉकडाउन केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या सहकारी संस्थांना १५ महिने मुदतवाढ मिळाली. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने लॉकडाउन उठविले असून, सर्व व्यवहारही सुरळीत झालेत. त्यामुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या जिल्हा बॅंकांची निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सप्टेंबरमध्ये मतदार यादी पूर्ण होऊन ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

हेही वाचा: सातारा: जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात बिबट्या

सहकार विभागाने सहकारी संस्थांना दिलेली मुदत काल मंगळवारी संपली आहे. त्यामुळे राज्यभरातील सुमारे ६५ हजार सहकारी संस्थांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या जिल्हा बॅंकांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर सहकारी विभाग सुरुवातीला लहान संस्थांची निवडणूक होतील. मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होतील. त्यामध्ये सुरुवातीला गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका व त्यानंतर मोठ्या बॅंकांच्या निवडणुका होतील. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा: सातारा : भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडीची भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी

सहकार विभाग निवडणूक घेण्याची तयारी करणार असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘आणखी जास्त वेळ मुदतवाढ देणे योग्य नसून आता टप्प्याटप्प्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामध्ये प्रथम लहान सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. गृहनिर्माण संस्थांपासून सुरुवात केली जाईल. जिल्हा बॅंकांची निवडणुका संपल्यानंतर या निवडणुका घेतल्या जातील. त्यानंतर मोठ्या बॅंकांच्या निवडणुका होतील. कोरोनाचे नियम पाळून या निवडणुका घेतल्या जातील.’’

हेही वाचा: सातारा जिल्हा परिषदेचा दिल्लीमध्ये डंका

सर्व निवडणुकांचा ताळमेळ घालावा लागणार

मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची संख्या मोठी असल्याने या निवडणुका टप्प्याटप्प्याने घ्याव्या लागणार आहेत. याच दरम्यान, पालिका, महापालिका व त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत. या सर्व निवडणुकांचा ताळमेळ घालून सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. कोरोनाची तिसरी लाट आली, तर मात्र, पुन्हा मुदतवाढ देणे हाच पर्याय राहणार आहे. ते सर्व येणाऱ्या परिस्थितीवर अवलंबून आहे.

loading image
go to top