
Russia Ukraine War: चेल्सी फुटबॉल क्लब मालकाच्या संपत्तीवर येणार टाच?
चेल्सी (Chelsea) फुटबॉल क्लबचे रशियन मालक रोमन अॅब्रामोव्हिच (Roman Abramovich) यांना रशिया - युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. लेबर पार्टीचे खासदार ख्रिस ब्रायंट (MP Chris Bryant) यांनी ब्रिटीश सरकारला रोमन अॅब्रामोव्हिच यांची सर्व संपत्ती जप्त करण्याची विनंती केली. त्यांनी रोमन अॅब्रामोव्हिच यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे.
ब्रायंट आपल्या वक्तव्यात म्हणाला की, 'गृह खात्याला अॅब्रामेव्हिच यांचे 2019 मध्ये रशिया सरकारशी लागेबांधे असल्याचे आढळून आले होते. याचबरोबर ते भ्रष्टाचार (Corruption) करत असल्याचेही आढळून आले होते.' या सर्व आरोपांवरून ब्रायंट यांनी चेल्सीचे रशियन मालक रोमन अॅब्रामेव्हिच (Chelsea Russian Owner Roman Abramovich) यांची संपत्ती युकेने जप्त करावी. याचबरोबर त्यांच्याकडून फुटबॉल क्लबची मालकी देखील काढून घेण्यात यावी अशी मागणी केली.
ब्रायंट यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना सरकारला विनंती केली की चेल्सीची मालकी अॅब्रामोव्हिच यांच्याकडून काढून घेण्यात यावी. द गार्डीयनने दिलेल्या वृत्तानुसार टायर 1 च्या विजा विषय लावून धरत ब्रायंट यांनी 'अॅब्रामोव्हिच कोर्टाच्या सुनावणीदरम्यान हे मान्य केले होते की त्यांनी राजकीय हितसंबंध जपण्यासाठी त्यांना पैसे मिळाले होते. त्यामुळे ब्रिटीश सरकारने या व्यक्तीने युकेमध्ये राहण्यासाठी केलेल्या अवैध कामांवर कारवाई केली पाहिजे.'
ब्रायंट यांनी सांगितले की, याबाबतची सर्व कागदपत्रे तीन वर्षापूर्वीच सादर करण्यात आली आहे. 'अॅब्रामोव्हिचकडे या देशात एखादा फुटबॉल क्लबची मालकी का असावी? त्यामुळे आपण त्यांची संपत्ती ज्यात 152 मिलियन युरो किंमतीच्या घराचाही समावेश आहे ती का जप्त करू नये?' असा सवाल देखील केला.