Ruturaj Gaikwad : शतकी खेळी! पुण्याचा ऋतुराज कसोटी संघाचेही दार ठोठावतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ruturaj Gaikwad Century Against New Zealand A Team

Ruturaj Gaikwad : शतकी खेळी! पुण्याचा ऋतुराज कसोटी संघाचेही दार ठोठावतोय

Ruturaj Gaikwad Century Against New Zealand A : भारताचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील सलामीवीर ऋतुराज गायकवाडने संधी मिळेल त्यावेळी भारतीय संघाकडून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्याने भारतीय अ संघाकडून खेळताना न्यूझीलंड अ संघाविरूद्ध तिसऱ्या आणि अंतिम अनऑफिशिअल कसोटी सामन्यात दमदार शतकी खेळी केली.

या शतकी खेळीच्या जोरावर ऋतुराज गायकवाडने भारतीय कसोटी संघाचे दार देखील ठोठावले आहे. दुर्दैवाने ऋतुराजच्या शतकी खेळीनंतरही न्यूझीलंडने पहिल्याच दिवशी भारताचा डाव 293 धावांवर संपवला.

हेही वाचा: Roger Federer : टेनिस कोर्टवरील 5 ऐतिहासिक 'Roger Things'

ऋुतारज गायकवाडने गेल्या 24 महिन्यात फार कमी कसोटी सामने खेळले आहेत. मात्र तरी देखील न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली. या शतकी खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार देखील मारले. ऋतुराजने भारताकडून आतापर्यंत 9 टी 20 सामने खेळले आहेत.

त्याने न्यूझीलंड अ विरूद्धच्या कसोटी सामन्यात उपेंद्र यादवसोबत 134 धावांची भागीदारी रचली. उपेंद्र यादवने 76 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने भेदक मारा करत 4 बाद 245 धावा करणाऱ्या भारताचा डाव 293 धावात संपुष्टात आणला.

हेही वाचा: Mumbai Indians : हाशिम अमला, कॅटिच MI मध्ये बजावणार मोठी भुमिका

न्यूझीलंडकडून मॅथ्यू फिशरने 14 षटके टाकत 52 धावात 4 विकेट्स घेतल्या. तर जेकब डफी आणि जो वॉकर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. भारत अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळ 5 धावा करून बाद झाला. तर सलामीवीर अभिमन्यू इश्विरन 38 धावा करून बाद झाला. रणजी ट्रॉफीत खोऱ्याने धावा करणाऱ्या सर्फराज खानला आपले खाते देखील उघडता आले नाही. आयपीएल स्टार रजत पाटीदार 52 चेंडूत 30 धावा करून बाद झाला.

Web Title: Ruturaj Gaikwad Century Against New Zealand A Team Knocking Indian Test Team Door

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..