
Ruturaj Gaikwad : गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धू-धू धुतले आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. ऋतुराज गायकवाडने गुवाहाटीत पहिले शतक झळकावले आहे. त्याने मॅक्सवेलच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.
ऋतुराज गायकवाडने आपल्या शतकी खेळीत 13 चौकार आणि 7 षटकार मारले. विशेष म्हणजे त्याने तिलक वर्मासोबत शतकी भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. ऋतुराजने अवघ्या 52 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या केली. ऋतुराजने आपल्या खेळीत 57 चेंडूत एकूण 123 धावा केल्या.
जर टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर, ऋतुराजच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 20 षटकात 222 धावा करता आल्या, त्याशिवाय सूर्यकुमार यादवने 39 आणि तिलक वर्माने 33 धावा केल्या.
ऋतुराजने डावाला सुरुवात केली. तेव्हा तो थोडा संघर्ष करताना दिसत होता. दूसऱ्या टोकावरून सातत्याने विकेट पडत होत्या. पण त्याने तिलक वर्मासोबत षटकार चौकारचा धावांचा पाऊस सुरूवात केली. आणि शेवटी खूप धावा केल्या. ऋतुराजने खतरनाक फलंदाजी केली, त्याने ग्लेन मॅक्सवेलच्या शेवटच्या षटकात 3 षटकार आणि 3 चौकारांसह 30 धावा केल्या.
या स्फोटक खेळीपूर्वी ऋतुराज गायकवाडची टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या केवळ 58 धावा होती, मात्र आता ती 123 वर पोहोचली आहे. या मालिकेत ऋतुराज गायकवाड संघाचा उपकर्णधार आहे, त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेतही पदक जिंकले आहे.
ऋतुराज गायकवाडसाठीही हे खास आहे कारण भविष्यात तो चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधारही होऊ शकतो, असे मानले जात आहे. महेंद्रसिंग धोनी 2024 मध्ये शेवटचा सीझन खेळणार आहे, अशा परिस्थितीत CSK मध्ये संक्रमणाचा काळ सुरू होईल आणि त्यानंतर गायकवाडला मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.