Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराजने ठोकली 10 डावात तब्बल 7 शतकं, 1 द्विशतक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ruturaj Gaikwad Vijay Hazare Trophy Record

Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराजने ठोकली 10 डावात तब्बल 7 शतकं, 1 द्विशतक

Ruturaj Gaikwad Vijay Hazare Trophy Record : महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत फायनलमध्ये सौराष्ट्रविरूद्ध 108 धावांची शतकी खेळी केली. ऋतुराज गायकवाडचा विजय हजारे ट्रॉफीतील (2021 पासून) ही सातवी सेंच्युरी ठरली. विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाडने 10 डावात 7 शतक आणि 1 द्विशतक ठोकले. त्याला फक्त दोन डावातच शतकी मजल मारता आलेली नाही. त्याने विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला.

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत शतकांचा पाऊस पाडणे सुरूच ठेवले आहे. त्याने क्वार्टर फायलनमध्ये उत्तर प्रदेशविरूद्ध नाबाद 220 धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्यानंतर सेमी फायलमध्ये आसामविरूद्ध 168 धावांची खेळी केली होती. आता फायलनमध्ये सौराष्ट्रविरूद्ध ऋतुराज गायकवाडने 108 धावांची शतकी खेळी केली.

याचबरोबर ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेशविरूद्धच्या सामन्यात शिवा सिंहच्या एका षटकात 7 षटकार ठोकून इतिहासात आपल्या नावाची नोंद केली होती.

याचबरोबर ऋतुराजने लिस्ट A क्रिकेटमध्ये 71 डावांमध्ये 15 शतके आणि 16 अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ऋतुराजने संथ सुरूवात करत 61 चेंडूत 19 धावा केल्या होत्या. मात्र त्याने पुढच्या 64 चेंडूत 83 धावा ठोकत आपले शतक साजरे केले. ऋतुराजच्या या शतकी खेळीच्या जोरावरच महाराष्ट्राने 200 पार धावसंख्या उभारली.