Team India Squad : सूर्यकुमार यादवची हकालपट्टी! टीम इंडियाला मिळाला नवा उपकर्णधार

Suryakumar Yadav
Suryakumar Yadavesakal

Team India Squad Ireland T20 Series : दुखापतीमुळे बर्‍याच दिवसांपासून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयर्लंडविरुद्धच्या तीन टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

भारताला 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी मलाहाइड, डब्लिन येथे तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. या मालिकेत भारतीय कर्णधारासोबत एक नवा उपकर्णधारही दिसणार आहे. या खेळाडूला नुकतेच एका मोठ्या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा कर्णधारही बनवण्यात आले आहे.

Suryakumar Yadav
ENG vs AUS Ashes 5th Test: रोमहर्षक कसोटी सामन्यात इंग्लंडचा नाट्यमय विजय! ब्रॉडने शेवट केला गोड

सूर्यकुमार यादव काही काळ टी-20 मध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत होता. मात्र आयर्लंड दौऱ्यासाठी युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला संघाचा उपकर्णधार करण्यात आले आहे. आगामी आशियाई क्रीडा 2023 साठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे कर्णधारपद देखील ऋतुराज गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. सध्या तो वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा भाग आहे.

Suryakumar Yadav
India squad for Ireland T20: 'तो' आला अन् थेट कर्णधार झाला! आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

इशान किशन आणि शुभमन गिल यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी डावाची सुरुवात केली आहे. त्याचवेळी युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड प्लेइंग 11 मध्ये अद्याप स्थान मिळाले नाही. अशा परिस्थितीत आगामी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळणे ही त्याच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Suryakumar Yadav
ENG vs AUS Ashes 5th Test: रोमहर्षक कसोटी सामन्यात इंग्लंडचा नाट्यमय विजय! ब्रॉडने शेवट केला गोड

ऋतुराज गायकवाडने भारतासाठी आतापर्यंत एक वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने वनडेमध्ये 19 धावा आणि टी-20 मध्ये 16.88 च्या सरासरीने 135 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 1 अर्धशतकांचा समावेश आहे.

ऋतुराज गायकवाडने अलीकडच्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या आहेत. ऋतुराजने आयपीएल 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 590 धावा केल्या.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ (Team India Squad Ireland T20 Series)

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप. सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com