जयपूर - ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या जोरावर त्रिशतकी धावा उभारणाऱ्या महाराष्ट्र संघाने विजय हजारे करंडक स्पर्धेत उत्तराखंड संघाचा १२९ धावांनी पराभव केला. त्यामुळे चार सामन्यांनंतर गटात चौथ्या स्थानापर्यंत प्रगती केली..महाराष्ट्राचे चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभव झाले आहेत. त्यांचे आठ गुण झाले आहेत. क गटात चारही सामने जिंकून मुंबई १६ गुणांसह आघाडीवर आहे, त्यानंतर पंजाब आणि गोवा अशी क्रमवारी आहे. उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राला विजयासह सरासरीतही सुधारणा करणे आवश्यक होते..प्रथम फलंदाजीत चार बाद १०० अशी त्यांची अवस्था झाली होती. तेव्हा परिस्थिती अडचणीची होत होती; परंतु कर्णधार ऋतुराज गायकवाडने आपला अनुभव पणास लावत ११३ चेंडूंत १२४ धावांची खेळी केली.ऋतुराज आणि सत्यजित बच्छाव यांनी पाचव्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर ऋतुराज आणि रामकृष्ण घोष यांनी १०६ धावांची भागीदारी करून संघाच्या खात्यात त्रिशतकी धावांची नोंद केली..संक्षिप्त धावफलक - महाराष्ट्र - ५० षटकांत ७ बाद ३३१ (अर्शिन कुलकर्णी १३, सिद्धेश वीर १२, अंकित बावणे १२, ऋतुराज गायकवाड १२४-११३ चेंडू, १२ चौकार, ३ षटकार, राहुल त्रिपाठी ३३, सत्यजित बच्छाव ५६-४५ चेंडू, २ चौकार, ४ षटकार, रामकृष्ण घोष ४७-३१ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, अवांतर २२, देवेंद्र सिंग बोरा १०-०-८१-३, अभय नेगी १०-१-६१-२, मयांक मिश्रा १०-१-५२-१) वि. वि. उत्तराखंड - ४३.४ षटकांत २०२ (युवराज चौधरी ३२, संस्कार रावत ५६, मयांक मिश्रा ३१, रामकृष्ण घोष ६-०-२४-२, राजवर्धन हंगरगेकर ६-०-३७-३, सिद्धेश वीर ९-०-३३-२, सत्यजित बच्छाव ४.४-१-२२-३).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.