Gambhir vs Sreesanth : 'मिस्टर फायटरची वाईट सवय...' गंभीरसोबतच्या भांडणानंतर श्रीसंतने व्हिडिओ बनवून केला मोठा गौप्यस्फोट

भारतीय क्रिकेट संघाचे दोन माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर आणि श्रीसंत लिजेंड्स लीग क्रिकेटमधील सामन्यादरम्यान भिडले...
Gambhir and Sreesanth Controversy Marathi News
Gambhir and Sreesanth Controversy Marathi Newssakal

Gambhir and Sreesanth Controversy News : भारतीय क्रिकेट संघाचे दोन माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर आणि श्रीसंत लिजेंड्स लीग क्रिकेटमधील सामन्यादरम्यान भिडले. बुधवारी, सुरतमध्ये या लीगच्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्सचे संघ आमनेसामने होते. गंभीर कॅपिटल्सचा कर्णधार आहे, तर श्रीसंत गुजरातचा गोलंदाज आहे.

या सामन्यादरम्यान गंभीर आणि श्रीसंत यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. इतकंच नाही तर मॅचनंतर श्रीसंतने X (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ पोस्ट करत गंभीरवर निशाणा साधला आणि मोठे खुलासे केले. गंभीरच्या वाईट वागणुकीमुळे तो इतका संतापला होता की, त्याला व्हिडिओ पोस्ट करावा लागला, असे श्रीसंतचे म्हणणे आहे.

भांडण कशी झाली?

या सामन्यादरम्यान गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्क एडवर्ड्स आणि गंभीर इंडिया कॅपिटल्ससाठी सलामीला आले. 30 चेंडूत 51 धावांच्या खेळीत कॅपिटल्सचा कर्णधार गंभीरने श्रीसंतला काही चौकार मारले. यानंतर श्रीसंतने निराशेने गंभीरकडे पाहत काही शब्द बोलल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

याला प्रत्युत्तर म्हणून गंभीरने या वेगवान गोलंदाजाकडे रोखून हातवारे केले. हा वाद इथेच थांबला नाही. सोशल मीडियावर देखील याचे पडसाद उमटले. श्रीसंतने त्याच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने गौतमवर गंभीर आरोप केले.

श्रीसंतने गंभीरवर केले मोठे आरोप

सामन्यानंतर श्रीसंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला ज्यामध्ये त्याने गौतम गंभीरवर जोरदार टीका केली. श्रीशांत म्हणाला की, "मिस्टर फायटर (गौतम गंभीरचे नाव न घेता) काय झाले याबद्दल स्पष्टीकरण द्यायचे होते. तो नेहमीच त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी भांडतो, तेही विनाकारण... तो त्याच्या वरिष्ठ खेळाडूंचा आणि वीरू भाई (वीरेंद्र सेहवाग)सह अनेक लोकांचाही आदर करत नाही. आज नेमके तेच घडले. तो मला पुन्हा पुन्हा चिथावणी देत ​​होता, तो फक्त माझ्याशी अशाच गोष्टी बोलत राहिला ज्या अत्यंत अशोभनीय होत्या, जे गौतम गंभीरने बोलायला नको होते.

श्रीशांत पुढे म्हणाला की, गौतम गंभीर काय म्हणाला ते लवकरच सर्वांना सांगणार आहे. येथे माझी कोणतीही चूक नव्हती. मला संपूर्ण परिस्थिती स्पष्ट करायची आहे. लवकरच किंवा नंतर तुम्हा सर्वांना समजेल की मिस्टर गौतीने काय केले आहे. त्याने वापरलेले शब्द आणि क्रिकेटबद्दल त्याने सांगितलेल्या गोष्टी Live मैदानात कुठेतरी ते मान्य नाही. माझं कुटुंब,माझं राज्य, सगळ्यांनी खूप काही केलंय. तुमच्या पाठिंब्याने मी ती लढाई लढली. आता लोकांना विनाकारण माझा अपमान करायचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com