VIDEO: धोनीच्या लाडक्या खेळाडूने लावला क्रिकेटमध्ये नवीन शॉटचा शोध! दिली उलट्या हाताची

क्रिकेटमध्ये याआधी कधीच पाहिले नसेल! मोईन अलीने ....
SA vs ENG Moeen Ali
SA vs ENG Moeen Ali

SA vs ENG Moeen Ali : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने क्रिकेटच्या शब्दसंग्रहात एक नवीन शॉट जोडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नादरम्यान मोईन अली अपयशी ठरला असला तरी त्याचा हा प्रयत्न सामन्यातील सर्वोत्तम क्षण ठरला. या शॉटला एका हाताने स्विच-स्वॅट शॉट असेही म्हणता येईल. इंग्लंडच्या डावाच्या शेवटच्या 10 षटकांमध्ये धावसंख्या वाढवण्यासाठी मोईन अली क्रीजवर आला. डेविड मलान आणि जोस बटलरच्या शतकानंतर मोईन अलीवर वेगवान धावा करण्याची जबाबदारी घेतली.

SA vs ENG Moeen Ali
IND vs NZ: शुभमन गिल नाही 'हा' खेळाडू आहे गेम चेंजर; सूर्यकुमार यादवचा धक्कादायक खुलासा

मोईन अलीने आठ चेंडूत 12 धावा केल्या आणि तबरेझ शम्सीच्या फिरकीचा सामना करत असताना त्याने या धाडसी शॉटचा प्रयत्न केला. शम्सी मोईनला ऑफ स्टंपच्या बाहेर उचलतो, परंतु मोईन अलीने आपली जागा बदलली, मोईन अली त्याच्या उजव्या हातात बॅट पकडतो आणि बॅकवर्ड पॉईंटमधून स्विंग करताना दिसला. हा चेंडू खेळताना तो चुकला असेल, पण पुढच्याच चेंडूवर मोईनने परत येऊन षटकार ठोकला.

SA vs ENG Moeen Ali
Hardik Pandya: धोनी नाही आहे त्यामुळे जबाबदारी माझी; हार्दिक म्हणाला 'आता मीच...'

त्याच्या डावातील चार षटकारांपैकी हा पहिलाच षटकार होता. मोईनने 23 चेंडूत 41 धावांची खेळी केली. दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांच्याशिवाय, जोफ्रा आर्चरच्या 6 विकेट्सच्या जोरावर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com