VIDEO : बुमराहच्या फटकेबाजीचं 'सोशल डिस्टन्सिंग सेलिब्रेशन!

 Jasprit Bumrah Six Rabada
Jasprit Bumrah Six RabadaSakal

South Africa vs India, 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहन्सबर्गच्या मैदानात रंगला आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघाचा डाव अवघ्या 202 धावांत आटोपला. भारताकडून कार्यवाहू कर्णधार लोकेश राहुलचे (KL Rahul) अर्धशतक आणि अश्विनने (Ravichandran Ashiwin) केलेली 46 धावांच्या खेळीशिवाय बुमराहची फटकेबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्या डावात नाबाद राहिलेल्या बुमराहने (Jasprit Bumrah) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) जलदगती गोलंदाज कागिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) एका षटकात 14 धावा कुटल्या.

भारतीय संघाच्या डावातील 62 व्या षटकात बुमराहने आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश केला. रबाडाच्या षटकात त्याने दोन खणखणीत चौकार आणि एक उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बुमराने मारलेला हुक शॉटनं भारताच्या खात्यात सहा धावा जमा झाल्या. त्याचा हा षटकार बघण्याजोगा होता. भारताच्या डावातील हा एकमेव षटकार ठरला. त्याच्या या षटकारानंतर व्हिआयपी ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या महिला क्रिकेट चाहत्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बुमराहच्या फटकेबाजीचं सेलिब्रेशन करताना दिसल्या.

 Jasprit Bumrah Six Rabada
PKL 8 Points Table : Puneri Paltan तळाला, जाणून घ्या टॉपला कोण?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात प्रेक्षकांना एन्ट्री नाही. खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबियांसाठी बायोबबल वातावरण तयार करण्यात आले असून फॅमिली मेंबर सामन्यासाठी उपस्थितीत असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नमकं कोण-कोण आहे हे स्पष्ट दिसत नाही. पण त्या महिला भारतीय खेळाडूंच्या कुटुंबियातूनच असाव्यात असेच वाटते. सामना पाहताना नियमावलीनुसार त्या योग्य ते अंतर ठेवून बसून सामन्याचा आनंद घेताना दिसले. बुमराहच्या फटकेबाजीवेळी दक्षिण आफ्रिकेत कोरोना निमायवलीचे पालन होत असल्याची एक झलकच पाहायला मिळाली.

 Jasprit Bumrah Six Rabada
SA vs IND : पंतवर तरी कधीपर्यंत भरवसा ठेवायचा?

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने 11 चेंडूत 14 धावांची नाबाद खेळी केली. यात त्याने 127.27 च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या. सोशल मीडियावर बुमराहच्या फटकेबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रबाडासारख्या गोलंदाजाची धुलाई केल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. बॅटिंगमध्ये कमाल दाखवल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी भेदक मारा करुन त्याने टीम इंडियाला दिलासा द्यावा अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा असेल. तो गोलंदाजीत कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com