पुजारा-अजिंक्यला अजूनही किंमत; कोहली दाखवणार खेळवण्याची हिंमत

Pujara and Ajinkya Rahane
Pujara and Ajinkya Rahane Sakal
Summary

अजिंक्यसह चेतेश्वर पुजाराही प्लेइंग इलेव्हनचा भाग दिसले तर आश्चर्य वाटायला नको. किंग कोहलीनेच याचे संकेत दिले आहेत.

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या केपटाऊन कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासादायक बातमी मिळाली. विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या कसोटीसाठी फिट असून तो मैदानात उतरणार आहे. आपल्या फिटनेससंदर्भात त्याने स्वत: माहिती दिली. याशिवाय त्याने अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) पुन्हा संधी मिळणार असल्याचे संकेत दिले. अजिंक्यसह चेतेश्वर पुजारावरही (Cheteshwar Pujara) अजून विश्वास आहे. त्यामुळे ते प्लेइंग इलेव्हनचा भाग दिसले तर आश्चर्य वाटायला नको. किंग कोहलीनेच याचे संकेत दिले आहेत.

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane) ही जोडगोळी गेल्या काही सामन्यांपासून नावाला साजेसा खेळ करताना दिसत नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) निर्णायक कसोटी सामन्यात या दोघांना किंवा त्यातील एकाचा पत्ता कट होणार अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. टीम इंडियाला अजूनही त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे पुन्ही संघ या जोडगोळीसह मैदानात उतरल्याचे दिसू शकते.

Pujara and Ajinkya Rahane
कोहलीला आठवला धोनीचा सल्ला; म्हणाला मला....

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या खराब कामगिरीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर विराट कोहलीने दोघांना संघात अजूनही किंमत असल्याचे बोलून दाखवले.

Pujara and Ajinkya Rahane
Covid Effect : SAI नं देशभरातील 67 ट्रेनिंग सेंटरचे शटर केलं डाऊन

विराट कोहली म्हणाला की,, पुजारा आणि रहाणे हे संघातील अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्या अनुभव अनमोल आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या दोघांनी आपल्यातील क्षमता सिद्ध करुन दाखवलीये. काही वेळा खेळाडू बॅडपॅचमधून जात असतो. सध्याला हे दोघेही त्याचा सामना करत आहेत. पण संघासाठी या दोघांचा अनुभव महत्त्वाचा ठरेल. या दोघांच्या खेळण्याबाबतचे संकेत देण्यासोबतच त्याने मोहम्मद सिराज खेळणार नसल्याचेही स्पष्ट केले. तो फिट नसून त्याच्यासंदर्भात कोणतीही रिस्क आम्ही घेणार नाही, असे विराट कोहलीने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com