esakal | सचिनच्या बर्थडेची लेकीनं केली खास तयारी

बोलून बातमी शोधा

sara tendulkar
सचिनच्या बर्थडेची लेकीनं केली खास तयारी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेट सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या बर्थडे दिवशी लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिने स्पेशल डिश केल्याचे दिसते. मास्टर ब्लास्टरच्या वाढदिवसादिवशी तिने आपल्या इन्स्टा अकाउंटच्या स्टेटसला एक खास फोटो ठेवला आहे. या फोटोमध्ये अनेक पदार्थ टेबलवर मांडल्याचे दिसते. 23 वर्षीय सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. याच माध्यमातून तिने वडिलांच्या वाढदिवसाचा खास मेन्यू शेअर केलाय. इंस्टाग्रामवर साराचे 1.2 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. सचिनच्या वाढदिवसाची लेकीन खास तयारी केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलीये.

हेही वाचा: IPL 2021,MI vs PBKS: मुंबईसमोर पंजाबचा भांगडा

img

sachin birthday menu

सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यापूर्वी इन्स्टा अकाउंटवरुन शेअर केलेल्या स्टोरीमुळे चर्चेत आली होती. 16 एप्रिल रोजी सायंकाळच्या दरम्यान तिने कारमध्ये बसून ब्लू टोकाई कॉफीचा स्वाद घेतल्याचा फोटो शेअर केला होता. यावरुन एका महिलेने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ही मुलगी बापाचा पैसा वाया घालवतेय. असा उल्लेख महिलेने केला होता. या महिलाला साराने सडेतोड उत्तर दिले होते. कैफिनवर खर्च केलाला खर्च हा उत्तम खर्च असतो, असे सांगत साराने संबंधित महिलेला उत्तर दिले होते.

img

sachin tendulkar Birthday