esakal | IPL 2021,MI vs PBKS: मुंबईसमोर पंजाबचा भांगडा

बोलून बातमी शोधा

MI vs PBKS
IPL 2021,MI vs PBKS: मुंबईसमोर पंजाबचा भांगडा
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कर्णधार केएल राहुलची नाबाद अर्धशतकी खेळी आणि गेलची तुफान फटकेबाजीच्या जोरावर पंजाबच्या संघाने मुंबईसमोर विजयी भांगडा केला. मुंबई इंडियन्सने दिलेले 132 धावांचे आव्हान पंजाब किंग्जने 14 चेंडू आणि 9 गडी राखून सहज पार केले. मयांक अग्रवालच्या रुपात मुंबई इंडियन्सला केवळ एक विकेट मिळाली. त्याने 20 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 25 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने 52 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 60 धावांची नाबाद खेळी केली. त्याला गेलने उत्तम साथ दिली. गेलने 35 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 43 धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा: IPL 2021: पहिली फिफ्टी लेकीसाठी; 'विराट' सेलिब्रेशन पाहिले का? (VIDEO)

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 63 (52) आणि सूर्यकुमार यादव 33 (27) यांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जसमोर धावांचे लक्ष्य ठेवले होते. सलामीवीर क्विंटन डिकॉक 3 धावांवर दीपक हुड्डाचा शिकार झाला. ईशान किशनही 6 धावांची भर घालून चालता झाला. बिश्नोईने त्याला बाद केले. सुरुवातीच्या धक्क्यानंतर रोहित शर्मा क्रिजमध्ये असूनही मुंबई इंडियन्स संघाची धावगती मंदावली. हिटमॅनने गियर बदलला. आणि सुर्यकुमारच्या साथीने त्याने तिसऱ्या विकेटसाठी 79 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

हेही वाचा: IPL 2021: विराट म्हणाला, स्ट्राईक देतो आधी सेंच्युरी कर! Video

बिश्नोईने मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का दिला. त्याने सुर्यकुमार यादवची विकेट घेतली. मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला बाद केले. त्याची जागा घेण्यासाठी आलेला हार्दिक पांड्याला अवघ्या एका धावेवर माघारी धाडले. अर्शदीपने त्याची विकेट घेतली. शमीने कृणाल पांड्याला 3 धावांवर माघारी धाडले. पोलार्डच्या 12 चेंडूतील 16 धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 6 विकेटच्या मोबदल्यात 131 धावा केल्या.

  • 130-6 : कृणाल पांड्याही स्वस्तात माघारी, शमीला मिळाले दुसरी विकेट

  • 122-5 : हार्दिक पांड्या अवघी एक धाव करुन परतला, अर्शदिपला मिळाली विकेट

  • 105-3 : सूर्यकुमार यादव 27 चेंडूत 33 धावा करुन माघारी, बिश्नोईला मिळाले यश

रोहित शर्माने 40 चेंडूत पूर्ण केली फिफ्टी

  • 26-2 : ईशान किशानच्या रुपात मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का, बिश्नोईला मिळाले यश

  • 7-1 : क्विंटन डिकॉकच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, दीपक हुड्डाला मिळाले यश

  • क्विंटन डिकॉक-रोहितनं केली मुंबईच्या डावाची सुरुवात