esakal | बर्थडे दिवशी सचिनचा मास्टर स्ट्रोक; प्लाझ्मा डोनेटचा संकल्प

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar
बर्थडे दिवशी सचिनचा मास्टर स्ट्रोक; प्लाझ्मा डोनेटचा संकल्प
sakal_logo
By
टीम ई सकाळ

क्रिकेटच्या मैदानात अशक्यप्राय लक्ष्य साध्य करुन दाखवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 48 वा वाढदिवस. बर्थडे दिवशी महान क्रिकेटने मोठा संकल्प केला आहे. कोरोनातून सावरल्यानंतर त्याने प्लाझ्मा डोनेट करणार असल्याची घोषणा केलीये. एवढेच नाही तर कोरोनातून सावरणाऱ्या प्रत्येकाने प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही मास्टर ब्लास्टरने केले आहे. मागील महिन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. यातून सावरुन तो आता पुन्हा घरी परतला असून बर्थडे दिवशी त्याने सध्याच्या कठिण परिस्थितीत प्लाझ्मा डोनेट करण्याचा महत्त्वाचा आणि मोठा संकल्प केलाय.

मास्टर ब्लास्टरच्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावरुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिकेटच्या मैदानात देवाची उपमा लाभलेल्या सचिनने ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. व्हिडिओमध्ये मास्टर ब्लास्टरची दाढी वाढल्याचेही दिसते. 2013 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

हेही वाचा: सचिनच्या बर्थडेची लेकीनं केली खास तयारी

तेंडुलकरने या व्हिडिओमध्ये म्हटलंय की, मी डॉक्टरांनी दिलेला संदेश पुढे पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मागील वर्षी प्लाझ्मा दान केंद्राचे उद्घाटन केले होते. कोरोनाच्या पेशंटला योग्य वेळी प्लाझ्मा दिला तर तो लवकर रिकव्हर होऊ शकतो, अशी माहिती मला डॉक्टरांनी दिली होती. ही गोष्ट मी स्वत:ही करणार आहे. यासंदर्भात मी माझ्या डॉक्टरांशी बोललो आहे. कोरोनातून सावरलेल्या सर्वांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहनही सचिनने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यामातून म्हटले आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल खूप खूप आभार, असा उल्लेखही सचिनने यावेळी केला.

महिना कसोटीचा होता

कोरोनाची लागण झाल्यानंतर महिन्याभराचा काळ खूप कठिण होता. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 21 दिवस क्वारंटाईन रहावे लागले. मित्रमंडळी आणि कुटुंबियांने केलेली प्रार्थना कामी आली. डॉक्टर आणि त्यांच्यासोबत असणारा इतर स्टाफ यांच्याकडून उपचारासोबतच सकारात्मक ऊर्जा मिळाली, सर्वांचे खूप आभार, असेही सचिनने म्हटले आहे.