Sachin Tendulkar Farming : शेतकरी सचिन! पिकवला हरभरा, पालक अन् वांगी; VIDEO व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar Farming VIDEO

Sachin Tendulkar Farming : शेतकरी सचिन! पिकवला हरभरा, पालक अन् वांगी; VIDEO व्हायरल

Sachin Tendulkar Farming VIDEO : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. सचिन तेंडुलकर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कोणते प्रमोशनल व्हिडिओ शेअर करत नाही तर साधे साधे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो आपल्या व्हेजिटेबल गार्डनची चाहत्यांना सैर घडवत आहे.

हेही वाचा: Umran Malik : मलिकचा सर्वात वेगवान चेंडू अडकला वादात; हिंदीचं खंर की इंग्रजीचं...

सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत आपल्या व्हेजिटेबल गार्डनमध्ये भाजा तोडचाना दिसत आहे. यावेळी सचिनने आपल्या या छोट्याशा शेतात काय काय पिकवलं आहे याची माहिती दिली. सचिन व्हिडिओ शेअर करत म्हणतो. 'या भाज्यांच्या नावांचा वापर करत एक वाक्य बनवू शकता का? मी तयार केलं आहे. आशा आहे की भारतीय फलंदाज दुसऱ्या संघाच्या गोलंदाजांचे भरीत बनवत रहावे.'

हेही वाचा: ICC ODI Ranking : विराटची रँकिंगमध्ये उसळी, स्मिथला टाकलं मागं; रोहितही फायद्यात

सचिन तेंडुलकरने यापूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चुलीवर जेवण करणाऱ्या महिलांचा देखील व्हिडिओ शेअर केला होता. तसेच प्रवासात चहाच्या टपरीवरील चहा आणि होम मेड बिस्किट्सचा देखील आस्वाद घेतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना भारताने 67 धावांनी जिंकला. भारताने लंकेसमोर 374 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र कर्णधार दसुन शानकाच्या झुंजार 108 धावांच्या शतकी खेळीनंतरही श्रीलंकेला 306 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून माजी कर्णधार विराट कोहलीने 83 चेंडूत 113 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना हा 12 जानेवारीला कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?