Sachin Tendulkar : इंटरनेटवर त्या जाहिराती पाहून क्रिकेटचा देव थेट पोलिस स्टेशनमध्ये! जाणून घ्या प्रकरण

Sachin Tendulkar Fraud
Sachin Tendulkar Fraud

Sachin Tendulkar Fraud : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या परवानगीशिवाय फार्मास्युटिकल उत्पादनांची जाहिरात केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवला आहे. अज्ञात लोकांनी सचिनचे नाव, फोटो आणि आवाजाचा वापर त्याच्या परवानगीशिवाय जाहिरात करण्यासाठी केला आहे. तेंडुलकरच्या एका सहाय्यकाने गुरुवारी पश्चिम विभागीय सायबर पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Sachin Tendulkar Fraud
IPL 2023 Points Table: गुजरात टायटन्स होऊ शकतात बाहेर! मुंबई इंडियन्सने बिघडवले सर्व संघांचे समीकरण

तक्रारदाराने सांगितले की, त्याला एका फार्मास्युटिकल कंपनीची ऑनलाइन जाहिरात आली, ज्यात सचिन कंपनीच्या उत्पादन लाइनला मान्यता देत असल्याचा दावा केला होता. त्यांना sachinhealth.in ही वेबसाइट देखील सापडली, ज्याने तेंडुलकरचे छायाचित्र वापरून या उत्पादनांची जाहिरात केली आहे.

Sachin Tendulkar Fraud
MI vs GT : 'आमच्या संघातून फक्त रशीदच...' गुजरातच्या पराभवानंतर कर्णधार पंड्या संतापला

तक्रारीत म्हटले आहे की सचिनने कंपनीला त्याचे नाव आणि छायाचित्रे वापरण्याची परवानगी दिली नाही, म्हणून त्याने त्याच्या सहकाऱ्याला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

माहिती तंत्रज्ञान कायद्याव्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट) आणि 500 ​​(बदनामी) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Sachin Tendulkar Fraud
IND vs PAK: वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाक सामना होणार नाही! PCB अध्यक्षांच्या वक्तव्याने उडाली खळबळ

काय प्रकरण आहे?

५ मे रोजी तक्रारदाराला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एक जाहिरात दाखवण्यात आली, ज्यामध्ये सचिनचा फोटो दिसत होता. या जाहिरातीत सचिन या उत्पादनांना मान्यता देतो, असे म्हटले होते. ही वेबसाइट सचिनच्या नावाचा वापर करून फॅट कमी करणारे स्प्रे विकत होती. उत्पादन खरेदी करणाऱ्या व्यक्तीला सचिनच्या स्वाक्षरीचा टी-शर्टही मिळेल, असा दावाही केला जात होता. मात्र, हे वास्तव नाही. या कारणावरून पोलिसात तक्रार करण्यात आली असून आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com